… तर २०२१ असेल चांगल्या बातमीचे ; बिल गेट्स यांचा विश्वास

दिल्ली : कोरोनामुळे यंदाचे संपूर्ण वर्ष दहशतीखाली गेले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट‌्स यांनी आपल्या वैयक्तिक ब्लॉग 'गेटस नोट‌्स‌'वर चालू वर्षाला निरोप देणारी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी २०२० चे 'विध्वंसक वर्ष' असे वर्णन केले असून, २०२१ कडून वैज्ञानिक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

दिल्ली : कोरोनामुळे यंदाचे संपूर्ण वर्ष दहशतीखाली गेले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट‌्स यांनी आपल्या वैयक्तिक ब्लॉग ‘गेटस नोट‌्स‌’वर चालू वर्षाला निरोप देणारी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी २०२० चे ‘विध्वंसक वर्ष’ असे वर्णन केले असून, २०२१ कडून वैज्ञानिक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या साथीने जगभरात ७३ दशलक्ष लोकांना संसर्ग झाला आहे. १.६ दशलक्ष लोकांचा बळी घेतला आहे. आर्थिक नुकसानीचा आकडा लक्षावधी कोटींमध्ये आहे. गेट‌्स यांनी पुढे लिहिले की, कोणतीही नवी लस विकसित करण्यासाठी साधारणत: १० वर्षे लागत असताना शास्रज्ञांनी १० महिन्यांतच कोविड-१९ विरोधातील लस विकसित केली आहे. २०२१ बाबत लोकांच्या मनात आशावाद निर्माण करणारी ही घटना आहे. इतरही अनेक आशावादी वैज्ञानिक घडामोडींची अपेक्षा २०२१ या नवीन वर्षाकडून आहेत. मॉडर्ना आणि फायझर/बायोएनटेक लसींचा उत्तम परिणाम अपेक्षित आहे. मृत्यू आणि संसर्गाच्या संख्येत लक्षणीय कपात होईल. जीवन सामान्य होण्याच्या नजीक आपण पोहोचत आहोत, असेही त्यांनी लिहिले.