nasa asteroid alert

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, 2023 DZ2 म्हणून ओळखला जाणारा हा लघुग्रह शनिवारी चंद्राच्या कक्षेपासून 320,000 मैल (515,000 किलोमीटर) अंतरावर जाईल. त्याचा आकार 130 फूट आणि 300 फूट किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो.

नासा (NASA) ही अवकाश संस्था अंतराळात होत असलेल्या बदलांविषयीची माहिती कायम देत असते. यावेळी नासाने पृथ्वीवर येणार्‍या एका धोक्याचा इशारा दिला आहे. एक विशाल 200 फूट लघुग्रह (Asteroid) पृथ्वीच्या दिशेने सरकत असल्याचं नासाने म्हटलं आहे. नासाने या उपग्रहाचा वेग आणि पृथ्वीपासून या उपग्रहाचे अंतर याबाबतची माहिती दिली आहे. (NASA Asteroid Alert)

अ‍ॅस्टरॉइड अर्थात लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. अवकाशातून अनेक लघुग्रह हे पृथ्वीच्या दिशेने येत राहतात. यापैकी काही एकदम लहान आहेत. तर काही थेट समुद्रात पडतात. पण कधीकधी काही लघुग्रह पृथ्वीवर पडण्याची शक्यता असते. त्यांच्यामुळे मोठा विध्वंस होतो. शास्त्रज्ञांच्या मते हा लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक नाही. लघुग्रह आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी आहे. ते पृथ्वी जवळून जाणार असले तरी त्याचा आपल्याचा धोका नाही.


खगोलशास्त्रज्ञांच्या मते, 2023 DZ2 म्हणून ओळखला जाणारा हा लघुग्रह शनिवारी चंद्राच्या कक्षेपासून 320,000 मैल (515,000 किलोमीटर) अंतरावर जाईल. त्याचा आकार 130 फूट आणि 300 फूट किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. याचाच अर्थ तो कुतुबमिनार इतका मोठा असू शकतो. ज्याची उंची 73 मीटर (239.5 फूट) आहे. अवकाशात अनेक लघुग्रह फिरत असतात. पण, एवढ्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार ही दुर्मिळ घटना आहे. याप्रकारच्या खगोलीय घटना दहा वर्षातून फक्त एकदाच घडतात, असं नासाचं म्हणणं आहे.

नासाने हा लघुग्रह पृथ्वीवर येणार नाही अशी ग्वाही दिली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे प्लॅनेटरी डिफेन्सचे प्रमुख रिचर्ड मॉइसेल म्हणाले की, हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता खूपच कमी आहे. खगोल शास्त्रज्ञांसाठी निरीक्षण करण्याची ही एक उत्तम संधी असेल. व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टद्वारे ही खगोलीय घटना पाहता येणार आहे.