
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "डेव्हिल टर्न" म्हणून ओळखल्या जाणार्या ठिकाणी हा अपघात झाला. हे पेरूतील सर्वात धोकादायक वळण आहे
पेरू : पेरू देशातून रस्ते अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर पेरूमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली.( Peru Bus Accident) 60 प्रवाशांना घेऊन जाणारी बस खडकावरून पडली आणि या दुर्देवी घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला. बसमधील अनेक प्रवासी हे हैतीचे असल्याची माहिती आहे, कारण पेरूमध्ये हैतीयन स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या घटनेत या प्रवाशांनी जीव गमावल्याच बोललं जात आहे.
कुठे घडला अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “डेव्हिल टर्न” म्हणून ओळखल्या जाणार्या ठिकाणी हा अपघात झाला. हे पेरूतील सर्वात धोकादायक वळण आहे, ज्यावर वारंवार अपघात होतात. असं म्हण्टलं जातं. पेरूच्या उत्तरेकडील एल अल्टो जिल्ह्यातील क्यूओरिआंका टूर्स अगुइला डोराडा या कंपनीच्या बसमध्ये हा अपघात झाला. अपघाता दरम्यान अनेक प्रवाशांनी बसमधून उडी मारून स्वत:ला वाचवले, मात्र बहुतांश प्रवासी आत अडकले. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमी प्रवाशांना लिमाच्या उत्तरेस 1,000 किलोमीटर (620 मैल) दूर असलेल्या एल अल्टो आणि मॅनकोरा या लोकप्रिय रिसॉर्टमधील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सर्वांवर उपचार सुरू आहेत.