
पोलंडमध्ये दुसऱ्या महायुद्धाचा स्फोट न झालेला बॉम्ब सापडल्यानंतर हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर त्याला निकामी करण्यात आलं.
पोलंडच्या लुब्लिन शहरात दुसऱ्या महायुद्धाचा बॉम्ब (Bomb In World War II ) सापडला आहे. यानंतर, शहरातील सुमारे 14,000 लोकांना तात्पुरती घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले. लोकांना शाळा आणि इतर इमारतींमध्ये हलवण्यात आले. तसेच, त्यांना घरातील सर्व विद्युत उपकरणे, पाणी आणि गॅस बंद करण्यास सांगितले होते.
बांधकामाच्या ठिकाणी सापडलेल्या या बॉम्बचे वजन 250 किलो आहे. यानंतर बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब काढून निकामी केला. बॉम्ब निकामी केल्यानंतर लोकांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब पोलंडमध्ये यापूर्वीही अनेकदा सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी जर्मनीतील डसेलडॉर्फ शहरात 500 किलो वजनाचा बॉम्ब सापडला होता. बॉम्ब सापडल्यानंतर 13,000 लोकांना तात्पुरते शाळांमध्ये हलवण्यात आले.
पोलंडमध्ये यापूर्वीही असे बॉम्ब सापडले आहेत
मागील महिन्यातही शाळेच्या नूतनीकरणादरम्यान काही तोफगोळे सापडले होते. गेल्या वर्षी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे 500 किलो वजनाचा बॉम्ब सापडला होता, त्यानंतर 30,000 लोकांना तात्पुरती घरे सोडावी लागली होती.