नायजेरियामध्ये मोठा अपघात! फेरी बोट 26 जणांचा मृत्यू,अनेक बेपत्ता!

. या अपघातातील सुमारे 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, उर्वरित प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.

    नायजेरियामध्ये मोठा फेरी बोट (Nigeria Boat Accident) उलटून मोठा अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बोट ही बोट नदीत उलटल्याने 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 26 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. मागच्या तीन महिन्यातील ही दुसरी मोठी दुर्घटना असल्याचं सांगितलं जात आहे.

    बोट उलटून 26 प्रवाशांचा मृत्यू

    रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी पहाटे बोट उलटून अपघात झाला. या घटनेत 26 जणांचा बुडून मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता आहेत. नायजेरियाच्या नायजर राज्याच्या गव्हर्नरचे प्रवक्ते बोलगी इब्राहिम यांनी सांगितले की, “अपघात झालेल्या बोटीवर 100 हून अधिक लोक होते. बोटीत महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या बोटीच्या दुर्घटनेत प्राण गमावलेले आणि बेपत्ता झालेले लोक येथे उपस्थित असलेले धरण ओलांडून आपापल्या शेतात जात होते. मृतांमधील बहुतांश लोक शेतकरी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील सुमारे 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, उर्वरित प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.