migrants died in boat accident

एक बोट इंग्लिश खाडीमधून(English Channel Accident) पार होत असताना बुडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. त्यापैकी ३१ जणांचा मृत्यू(31 Dead In Boat Accident In English Channel) झाला असून २ जण अद्याप बेपत्ता आहेत.

    अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, सुदान, इराक किंवा इतर आखाती देशांमधील ढासळती आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर ब्रिटन(Britain) आणि फ्रान्स(France) या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या स्थलांतर (Migration In Britain And France) होत आहे. हे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असूनही स्थलांतर काही थांबलेले नाही गेल्या महिन्याभरात या स्थलांतरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

    बुधवारी अशीच एक बोट इंग्लिश खाडीमधून(English Channel Accident) पार होत असताना बुडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. त्यापैकी ३१ जणांचा मृत्यू(31 Dead In Boat Accident In English Channel) झाला असून २ जण अद्याप बेपत्ता आहेत. ही बोट बुडाल्याची माहिती मिळताच ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशातील सागरी व्यवस्थापनाने संयुक्तपणे स्थलांतरीतांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. मात्र त्यांना यश मिळाले नाही.

    ब्रिटन आणि फ्रान्स या देशांमध्ये समुद्री मार्गाने जाण्यासाठी असलेल्या इंग्लिश खाडीमधून स्थलांतरीतांच्या वाहतुकीचं प्रमाण वाढलं आहे.