garbage on mount everest

माउंट एव्हरेस्टसह चार पर्वतांवर राबविण्यात (Garbage On Mount Everest) आलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान, स्वच्छता (Cleaning On Mount Everest) टीमला सुमारे ३३.८ टन कचरा मिळाला आहे.

    कचरा नाही असे ठिकाण सापडणे सध्या कठीण आहे. लोक कुठेही कचरा टाकताना आपल्याला दिसतात. मात्र आता लोक बेजबाबदार वर्तन माउंट एव्हरेस्टसारख्या (Mount Everest) ठिकाणीही करू लागले आहेत. नुकत्याच माउंट एव्हरेस्टसह चार पर्वतांवर राबविण्यात (Garbage On Mount Everest) आलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान, स्वच्छता (Cleaning On Mount Everest) टीमला सुमारे ३३.८ टन कचरा मिळाला आहे.

    नेपाळ आर्मीच्या नेतृत्वात ‘सफाई अभियान २०२२’ ५ एप्रिल रोजी सुरू करण्यात आले. नेपाळ आर्मी आणि शेर्पा यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. या मोहीमेचा समारोप जागतिक पर्यावरण दिनी ५ जून २०२२ रोजी झाला. या मोहिमेत टीमने माउंट एव्हरेस्ट, ल्होत्से, कांगचेनजंगा आणि मनास्लू येथून ३३,८७७ किलो कचरा गोळा केला.

    या ऑपरेशनमध्ये लष्कराचे ३० जवान, ४८ शेर्पा आणि ४ डॉक्टर यांचा सहभाग होता. मोहीम संपल्यानंतर नेपाळचे लष्करप्रमुख प्रभू राम शर्मा यांनी सांगितलं की, पर्यावरणाची सातत्याने हानी होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा मोहीमेची गरज आहे. ही मोहीम राबविणाऱ्या टीमने सांगितले की, संपूर्ण मोहीमेत आम्हाला दोन प्रकारचा कचरा (जैवविघटनशील आणि नॉन-बायोडिग्रेडेबल) आढळून आला आहे. टीमने माहिती दिली की माउंट एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखरे साफ करण्यासाठी ५५ दिवस लागले, तर कंचनजंगा आणि मनास्लूमध्ये अनुक्रमे ४४ आणि ४३ दिवस लागले.

    टीमने सांगितले की ही विशेष स्वच्छता मोहीम २०१९ मध्ये सुरू करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी या चार पर्वतरांगांमधून सुमारे १० टन कचरा बाहेर पडला. त्यानंतर २०२० मध्ये कोरोनामुळे मोहीम सुरू होऊ शकली नाही. चार डोंगरांमधून २०२१ मध्ये सुमारे २७ टन कचरा बाहेर आला.