हुकूमशहा किम जोंग उन यांनी कबूल केले आहे की, सरकार आपल्या नागरिकांना खायला देऊ शकत नाही. दुसरीकडे, युनायटेड नेशन्स एजन्सी एफएओने म्हटले आहे की उत्तर कोरियामध्ये केवळ दोन महिने रेशन शिल्लक आहे. किम जोंग उन यांनी या संकटाविषयी संपूर्ण माहिती दिली नाही

    प्योंगयांग: कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया उपासमारीच्या दिशेने वाटचाल करत आहे. उत्तर कोरियामध्ये आता फक्त दोन महिने पुरेल इतकेचअन्न शिल्लक आहे. याबाबात हुकूमशहा किम जोंग उन यांनी परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियामध्ये अन्नपदार्थाची कमतरता इतकी आहे की देशात एक चहा ५१०० रुपयांना विकला जात आहे. त्याचबरोबर कॉफीची किंमत ७३०० रुपयांवर पोहोचली आहे. तर एक किलो केळी ३,३३६ रुपयांना विकली जात आहे.

    नेमकी परिस्थिती कशामुळे?
    कोरोना संकटात उत्तर कोरियाला दुहेरी त्रास होत आहे. उत्तर कोरियाने हा साथीचा त्रास टाळण्यासाठी चीनबरोबरच्या आपल्या सीमा बंद केल्या. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. त्याच वेळी, या वर्षी आलेल्या बर्‍याच समुद्री वादळांनी देशाची पिके उध्वस्त केली. यामुळे उत्तर कोरियाचे कृषी उत्पादन रखडले आहे. या दुहेरी संकटामुळे देशात फक्त दोन महिने अन्न शिल्लक आहे.

    ‘उत्तर कोरियामध्ये फक्त दोन महिने रेशन बाकी’
    खाद्यपदार्थांच्या कमतरतेमुळे वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या संकटाच्या परिस्थितीत लोकांमध्ये अशी भीती आहे की, ही परिस्थिती १९९० च्या काळातील उपासमारीसारखीच आहे. त्या दशकात उपाशीपोटी उत्तर कोरियामधील तीस लाख लोक मरण पावले होते. उत्तर कोरियामध्ये सध्या साखर, तेल आणि मैद्याची कमतरता आहे. याशिवाय तांदूळ व इंधनाचा पुरवठाही सुरळीत नाही.

    दरम्यान, हुकूमशहा किम जोंग उन यांनी कबूल केले आहे की, सरकार आपल्या नागरिकांना खायला देऊ शकत नाही. दुसरीकडे, युनायटेड नेशन्स एजन्सी एफएओने म्हटले आहे की उत्तर कोरियामध्ये केवळ दोन महिने रेशन शिल्लक आहे. किम जोंग उन यांनी या संकटाविषयी संपूर्ण माहिती दिली नाही परंतु भुकेल्यासारख्या परिस्थितीसाठी जनतेने तयार असले पाहिजे, असे सांगितले. किम जोंग उन यांनी कार्यकर्त्यांना या संकटातून जनता वाचवण्यासाठी काम करण्यास सांगितले आहे.