newzealand earthquake

केरमाडेक द्वीप समूह न्युझीलंडची राजधानी असलेल्या वेलिंगटनच्या उत्तरपूर्व भागात आहे. हा बेटांचा समूह साधारण २० किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या भागात काही ज्वालामुखी असल्याने कायम भूकंपाच्या धक्क्यांमुळे धोका निर्माण होतो.

न्यूझीलंड: न्यूझीलंडमध्ये (New Zealand) केरमाडेक बेटावर आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल असल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटावर १० किलोमीटवर खोलीवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भूकंपानंतर त्सुनामीचं संकट तात्पुरतं टळलं आहे पण आगामी काळात ते येण्याचा (Tsunami) इशाराही देण्यात आला आहे. (New Zealand Earthquake)

भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या ३०० किलोमीटरच्या परिसरातील सर्व बेटांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. न्यूझीलंडमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात. कारण, ते पॅसिफिक प्लेट आणि ऑस्ट्रेलियन प्लेटच्या सीमेवर वसलेलं आहे. याशिवाय ‘रिंग ऑफर फायर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीव्र भूकंपीय प्रदेशाच्या काठावर आहे. दरवर्षी न्यूझीलंड हजारो भूकंपाच्या धक्क्याने हादरलं जातं. दरम्यान, ६ फेब्रुवारीला टर्की आणि सीरिया भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली होती. हा भूकंप ७.८ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपात ५० हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला.  भूकंपामध्ये अनेक घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या. भारताने दोन्ही देशांना मदतीसाठी एनडीआरफ आणि जवानांची तुकडी पाठवली होती.

ज्वालामुखीचा भाग
केरमाडेक द्वीप समूह न्युझीलंडची राजधानी असलेल्या वेलिंगटनच्या उत्तरपूर्व भागात आहे. हा बेटांचा समूह साधारण २० किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या भागात काही ज्वालामुखी असल्याने कायम भूकंपाच्या धक्क्यांमुळे धोका निर्माण होतो. न्यूझीलंडच्या मीडियाकडून सांगण्यात आलं आहे की सुरक्षेचे सगळे उपाय केले जात आहेत. कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

ऑस्‍ट्रेलियातही जाणवले धक्के
हा भूकंप इतका भयानक होता की याचे धक्के ऑस्ट्रेलियातही जाणवले. आपत्कालीन व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं की, फिजी, न्‍यूझीलंड आणि टोंगामध्ये ०.३ मीटर उंचीच्या लाटा दिसल्या. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ऑस्‍ट्रेलिया आणि न्‍यूझीलंडला त्सुनामीचा तितका धोका नाही.