इंडोनेशियाच्या सोलोमन बेटांजवळ ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

सोलोमन बेटांजवळ ७.३ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर स्तुनामीचा इशारा देण्यात आला आहे. इंडोनेशियाच्या जावा बेटावर सोमवारी (२१ नोव्हेंबर) झालेल्या भीषण भूकंपामुळे १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ एवढी होती. तसेच, राजधानी जकार्तामध्ये भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.६ इतकी मोजली गेली होती.

    जकार्ता – सोलोमन (Solomon) बेटांजवळ ७.३ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर (Earthquake) स्तुनामीचा (Tsunami) इशारा देण्यात आला आहे. यूएस जियोलॉजिकल सर्व्हेच्या (US Geological Survey) अहवालानुसार, सोलोमन बेटांजवळ शक्तिशाली भूकंपानंतर स्तुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

    इंडोनेशियाच्या जावा बेटावर सोमवारी (२१ नोव्हेंबर) झालेल्या भीषण भूकंपामुळे १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ एवढी होती. तसेच, राजधानी जकार्तामध्ये (Jakarta) भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.६ इतकी मोजली गेली होती.

    जावाच्या गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपातील मृतांची संख्या १६२ वर पोहोचली आहे. तर, भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये मुलांचाच समावेश होता. भूकंप आला त्यावेळी मुले शाळांमध्ये शिकत होती. भूगर्भशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जावाच्या सियांजूर भागात जमिनीपासून १० किलोमीटर खाली होता. भूकंपानंतर तिथे तब्बल २५ धक्के जाणवल्याची नोंद करण्यात आली आहे.