अमेरिकेत शाळेत पुन्हा गोळीबार! पोलिसांसह सात जणांचा मृत्यू

शाळेतील गोळीबाराच्या घटनेवर चिंता व्यक्त करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी याला 'रोग' म्हणून संबोधले. बंदुकीचा हिंसाचार थांबवण्यासाठी अमेरिकेला अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

उठसुठ गोळीबार करणाऱ्या लोकांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने अमेरिकन सरकार प्रयत्न करत आहेत. तरीही अमेरिकेत गोळीबाराच्या घटना (America School Firing) काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. एकीकडे या घटनांचा प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न केले जात असताना अमेरिकेत पुन्हा एकदा सामूहिक गोळीबाराची घटना घडली आहे. यावेळी हल्लेखोराने एका शाळेत गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. घटना नॅशविले ख्रिश्चन स्कूलची आहे. या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर तरुणी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेनेसीच्या नॅशविले येथील एका शाळेत सोमवारी ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी संशयित हल्लेखोराने शाळेच्या मागच्या बाजूच्या दरवाजाच्या प्रवेशद्वारातून इमारतीत प्रवेश केला. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी येत त्याला दुसऱ्या मजल्यावर घेरले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारत तो मारला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचण्या आधीच अनेक जणांवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत अनेकांचा मृत्यू किंवा जखमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बंदुकीचा हिंसाचार देशाला त्रास

शाळेतील गोळीबाराच्या घटनेवर चिंता व्यक्त करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घटनेला एक  ‘रोग’ म्हणून संबोधले. बंदुकीमुळे होणारा हिंसाचार थांबवण्यासाठी अमेरिकेला अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेतील बंदुकीतील हिंसा देशासाठी मोठी समस्या असल्याचे बायडेन म्हणाले. त्याच वेळी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी अमेरिकन काँग्रेसला (संसद) शस्त्रांवर बंदी घालण्याची विनंती केली.