पाकिस्तानात ऐन ईदच्या दिवशी मशिदीजवळ बॉम्बस्फोट, 7 जण ठार; 30 हून अधिक जखमी

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला असून त्यात ७ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी मस्तुंग जिल्ह्यात घडली, ज्या ठिकाणी यापूर्वी स्फोट झाला होता.

    पाकिस्तान मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बलुचिस्तानमध्ये एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट (Pakistan Blast) झाला असून त्यात ७ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी मस्तुंग जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.

    जगभरात आज ईद-ए-मिलाद-उन-नबी सण साजरा करण्यात येत आहे. पाकिस्तानात लोकं मोठ्या प्रमाणावर ईद साजरी व्यस्त असताना हा बॉम्बस्फोट झाला आहे. सकाळची वेळ असल्याने अनेक नागरिक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी आले होते. सहाय्यक आयुक्त अताउल्ला मुनीम यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटाचा प्रभाव जास्त होता कारण घटनास्थळी मोठी गर्दी होती. हा बॉम्बस्फोट का झाला आणि त्यामागे कोणाचा हात आहे? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. महिन्याच्या सुरुवातीलाही याच जिल्ह्यात बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 11 जण जखमी झाले होते.