Ukrainian President Zelensky Murder?

या युद्धात पुतिन यांच्या सैन्याला 1 वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्सचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या एकूण ३ अब्ज डॉलरच्या परकीय चलनाच्या साठ्यापेक्षा हे प्रमाण ३००० पट जास्त आहे.

मागच्या वर्षी आजच्याच दिवशी युक्रेनवर रशिया नावाचं संकट कोसळलं होतं. एक वर्षानंतरही युक्रेन अजुनही या संकटाचा सामना करत आहे. रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्धाला (Ukraine Russia War)आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर जोरदार हल्ला केला होता. युक्रेनची राजधानी कीववर (Kiev) लवकरात लवकर ताबा मिळवून झेलेन्स्कीची सत्ता आपल्या हाती घेण्याचा रशियाचा प्रयत्न होता. रशियाने यासाठी लाखो सैनिकांना तयार केलं. क्षेपणास्त्र, गोळीबारात  युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली. आज, युद्धाच्या 1 वर्षानंतरही, रशियाला अजुनही युक्रेनवर पुर्णपणे ताबा मिळवता नाही आलाय. या युद्धात आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 63 लाख लोक बेघर झाले आहेत. तर, या युद्धात रशियाला मोठं नुकसान झालं आहे. 

रशियाला मोठ्या प्रमाणात नुकसान

अमेरिकेच्या न्यूजवीक नियतकालिकाने दिलेल्या वृत्तानुसार, या युद्धात पुतिन यांच्या सैन्याला 1 वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्सचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या एकूण ३ अब्ज डॉलरच्या परकीय चलनाच्या साठ्यापेक्षा हे प्रमाण ३००० पट जास्त आहे. त्याचवेळी रशियाची 300 लढाऊ विमाने आणि 6300 हून अधिक सशस्त्र वाहने नष्ट झाली आहेत. युक्रेनच्या म्हणण्यानुसार, 130,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. रशियाने एवढ्या नुकसानीची कल्पनाही केली नव्हती, असे या अहवालात म्हटले आहे. एवढे नुकसान होऊनही पुतिन यांनी युक्रेनमधील युद्ध सुरूच ठेवण्याची शपथ घेतली आहे. अमेरिकेतील विल्सन सेंटरमधील रशियन अर्थव्यवस्थेचे तज्ज्ञ बोरिस ग्रोझोव्स्की यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, युक्रेन युद्धावरील रशियाचा खर्च आता 9 ट्रिलियनचा आकडा ओलांडला आहे.

युद्धाकाळात रोज 900 दशलक्ष डॉलर्स खर्च

युक्रेन सोबत युद्ध करातान रशिया सरकारने अतोनात पैसा खर्च केला.  यामध्ये युद्धासाठी लागणापऱ्या साहित्यापासुन तर सैनिकांच्याही अनेक बाबींचा समावेश आहे. 2022 सालासाठी रशियन सरकारची एकूण खर्चाची योजना $346 अब्ज होती, ज्यापैकी $46 अब्ज सैन्यावर आणि $36.9 अब्ज पोलीस आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसवर खर्च करायचे होते. पोलिस आणि एफएसबीचे पैसेही लष्कराला दिले जात असल्याचे एका रिपोर्ट मधुन समोर आले आहे. रशिया युद्धावर 50 टक्के अधिक खर्च करत असल्याचा अंदाज बोरिस यांनी व्यक्त केला आहे. तथापि, युक्रेनच्या व्यापलेल्या प्रदेशात तैनात जखमी सैनिक आणि शिक्षकांच्या उपचारावरील एकूण खर्च जोडला गेला तर युद्धाचा एकूण खर्च 15 ट्रिलियन रूबलपर्यंत पोहोचू शकतो. त्याच वेळी, आणखी एक तज्ज्ञ सीन स्पंट्स म्हणतात की बोरिसचा हा अंदाज खूपच कमी आहे आणि रशियाला यापेक्षा जास्त फटका बसला आहे.