तुर्कीमध्ये सापडले ९९ टन सोने, एकूण किंमत ६ अब्ज डॉलर्सच्या घरात

जिन्याची किंमत ६ अब्ज डॉलर्स असू शकते. दोन वर्षांत येथून सोन्याची खाण सुरू होईल आणि तुर्कीची अर्थव्यवस्थेला मजबूती मिळेल. माहिती मिळताच गुब्रेटसच्या शेअर्समध्ये १०% वाढ नोंदवली गेली.

तुर्कस्तान : तुर्कस्तानमधील एका शहरातील खत कंपनीत खजिना सापडला आहे. (gold found in Turkey) सोन्याचे प्रचंड साठे येथे सापडले आहेत. अहवालानुसार, सुमारे ६ अब्ज डॉलर्स किंमतीचे ९९ टन सोने सापडले आहे. सोगुत शहरातील कृषी सहकारी संस्था आणि गोबरेटस खत उत्पादन कंपनी चालवणारे फाहरेतीन पोयराज यांनी ही माहिती दिली आहे.

त्यांनी असे सांगितले की या खजिन्याची किंमत ६ अब्ज डॉलर्स असू शकते. दोन वर्षांत येथून सोन्याची खाण सुरू होईल आणि तुर्कीची अर्थव्यवस्थेला मजबूती मिळेल. माहिती मिळताच गुब्रेटसच्या शेअर्समध्ये १०% वाढ नोंदवली गेली.

पोयराज यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये त्यांची खत कंपनीने एका कंपनीकडून ही जागा घेतली होती. आता ते स्वतः या शोधात काम करतील. सप्टेंबरमध्ये तुर्कीने ३८ टन सोन्याचे उत्पादन करून विक्रम मोडला, अशी माहिती ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने मंत्री फेथ डॉनमेज यांनी दिली. येत्या पाच वर्षांत वार्षिक सोन्याच्या १०० टन उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले गेले आहे.