मूर्ती लहान,किर्ती महान ! ७ वर्षाच्या मुलानं प्रवासी विमानासोबत घेतली भरारी आणि…

केवळ ७ वर्षीय या कॅप्टनने प्रशिक्षणार्थी म्हणून सेसनाच्या १७२ विमानाचं आधीच उड्डाण केलं आहे. पायलट आणि अंतराळवीर होण्याचं स्वप्न आणि एक दिवस मंगळावर जाण्याची दांडगी इच्छा असल्याचं त्यांने सांगितलं. ग्रॅहम म्हणतो की, माझे रोल मॉडेल एलोन मस्क आहेत. मला एलोन मस्क आवडतात कारण मला त्याच्याकडून अंतराळाबद्दलची माहिती हवी आहे आणि मला त्यांच्यासोबत अंतराळात जाण्याची इच्छा आहे.

कंपाळा : ७ वर्षाच्या मुलाने कागदाचा विमान उडवताना पाहिला आहे. परंतु प्रवासी विमानासोबत भरारी घेणं आणि त्याला उडवणं म्हणजे अनोखा कारनामाच म्हणावं लागेल. आफ्रिकी देश युगांडातील ७ वर्षांच्या कॅप्टन कूलची चर्चा सध्या जोरात चर्चेत आहे. सेसना पॅसेंजर विमानाचं तीन वेळा उड्डाण करून कॅप्टनने वेगळाच विश्व विक्रम केला आहे. त्यामुळे कॅप्टनचं खरं नाव ग्रॅहम शेमा आणि त्याचे रोल मॉडेल अमेरिकन व्यावसायिका एलन मस्क आहेत.

केवळ ७ वर्षीय या कॅप्टनने प्रशिक्षणार्थी म्हणून सेसनाच्या १७२ विमानाचं आधीच उड्डाण केलं आहे. पायलट आणि अंतराळवीर होण्याचं स्वप्न आणि एक दिवस मंगळावर जाण्याची दांडगी इच्छा असल्याचं त्यांने सांगितलं. ग्रॅहम म्हणतो की, माझे रोल मॉडेल एलोन मस्क आहेत. मला एलोन मस्क आवडतात कारण मला त्याच्याकडून अंतराळाबद्दलची माहिती हवी आहे आणि मला त्यांच्यासोबत अंतराळात जाण्याची इच्छा आहे.

ही घटना युगांडाची राजधानी कंपाळाच्या हद्दीत घडली. घटनेच्या वेळी ग्रॅहम बाहेर खेळत होता आणि त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार पायलट होण्याचा किडा तेव्हापासून त्याच्या मुलाच्या मनात होता. ग्रॅहमच्या आईने सांगितलं की, या घटनेनंतरच मुलाने विमान कसे चालते हे शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर ग्रॅहमच्या आईने स्थानिक विमानचालन संस्थेशी संपर्क साधला आणि ग्रॅहमला घरी विमानाविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. पाच महिन्यांनंतर ग्रॅहम प्रथमच उड्डाण करताना म्हणाला, असं वाटतंय की पक्षी आकाशात उडतोय…