hijab controversy

राजधानी तेहरानच्या कोम प्रांतातील एका बँकेच्या मॅनेजरने गुरुवारी हिजाबशिवाय असलेल्या एका अज्ञात महिलेला बँक सेवा दिली होती.

  इराण : इराणमध्ये (Iran) हिजाब परिधान करणे सक्तीचं आहे. अशा परिस्थितीत हिजाब परिधान न करता बँकेत आलेल्या महिलेला सेवा दिल्याप्रकरणी एका बँक मॅनेरजला त्याची नोकरी गमवावी लागली आहे. इराणच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार ही घटना समोर आली आहे.

  मेहर न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, राजधानी तेहरानच्या कोम प्रांतात ही घटना घडली आहे.  एका बँकेच्या मॅनेजरने गुरुवारी हिजाबशिवाय असलेल्या एका अज्ञात महिलेला बँक सेवा दिली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गव्हर्नरच्या  मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. इराणमधील बहुतेक बँका राज्य-नियंत्रित आहेत. हिजाब कायद्याची अंमलबजावणी झाली करणे ही बँक मॅनेजरची जबाबदारी आहे. मात्र त्याने ही जबाबदारी न पाळल्याने त्याला नोकरी गमवावी लागली आहे.

  इराणमध्ये सुरु आहे आंदोलन

  इराणमध्ये महिलांसाठी हिजाब सक्तीचा कायदा लागू करण्यात आला आहे. महिलांना चेहरा, मान आणि केस झाकणं कायद्यानं सक्तीचे करण्यात आलं आहे. याला इराणच्या महिलांनी विरोध केला आहे.  महसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर हे विरोध प्रदर्शन अधिक तीव्र झालं. महिलांनी मोठ्या प्रमाणावर महिलांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. या दरम्यान महिलांकडून केस कापून आणि हिजाब जाळत सरकारचा निषेध करण्यात आला. अद्यापही इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनं सुरुच आहेत.

  1979 च्या नंतर इराणमध्ये हिजाब घालणं अनिवार्य

  इराणमध्ये 1979 च्या क्रांतीनंतर चार वर्षांनंतर हिजाब अनिवार्य करण्यात आला. मात्र, या वर्षीपासून राष्ट्रपतींच्या आदेशानुसार हिजाब घालणं सक्तीचं करण्यात आलं. याला विरोध करत अनेक महिला आंदोलनात सहभागी झाल्या. हे आंदोलन अद्यापही सुरुच आहे.