A bomb blast near the Pakistani city of Karachi has killed at least 14 people and injured more than 12 others

पाकिस्तानातील कराची येथे शनिवारी दुपारी भीषण स्फोट झाला. यात स्फोटात किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. कराचीच्या शेरशाह भागातील परचा चौकाजवळ हा स्फोट झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. स्फोटात जखमी झालेल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे(A bomb blast near the Pakistani city of Karachi has killed at least 14 people and injured more than 12 others).

    इस्लामाबाद : पाकिस्तानातील कराची येथे शनिवारी दुपारी भीषण स्फोट झाला. यात स्फोटात किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. कराचीच्या शेरशाह भागातील परचा चौकाजवळ हा स्फोट झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. स्फोटात जखमी झालेल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे(A bomb blast near the Pakistani city of Karachi has killed at least 14 people and injured more than 12 others).

    हा स्फोट एका खाजगी बँकेच्या खाली असलेल्या नाल्यात झाला. स्थानिक प्रशासनाने नाला साफ करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, परिसर खाली न झाल्याने याला विलंब झाला.

    या स्फोटात बँकेच्या इमारतीचे आणि जवळच असलेल्या पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीखालील नाल्यात गॅस जमा झाल्याने हा स्फोट झाल्याची शंका पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.