खऱ्या प्रेमाला बंधने नसतात.. ब्रिटनच्या एका जोडप्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ; जाणून घ्या त्यांची हटके लव्हस्टोरी

२०१२ साली एका स्थानिक पबमध्ये या दोघांची पहिली भेट घडली. या दोघांची ओळख त्यांच्या कॉमन मित्राने करून दिली होती. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले व ते एकमेकांना वरचेवर भेटत राहिले. पुढे २०१६ मध्ये दोघांचे लग्न झाले. आता या जोडप्याला ऑलिव्हिया नावाची एक मुलगी आहे, ती सुमारे दोन वर्षांची आहे.

    प्रेम एक सुखद आणि चिरकाल टिकणारी भावना आहे. प्रेमाला कोणतीही बंधन नसतात. ब्रिटनच्या जेम्स आणि क्लोची यांची प्रेमकहाणी इतकी सुंदर आहे की त्याची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.जेम्स आणि क्लो या पती-पत्नीच्या उंचीमध्ये बराच फरक आहे, असे असूनही या दोघांची मने जुळली आहेत. साहजिकच या दोघांमधील प्रेमाने त्यांना एकमेकांच्या जवळ आणले आहे.

    जेम्स आणि क्लोची यांच्या उंचीतील असलेल्या फरकामुळे या पती-पत्नीच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ३३ वर्षीय अभिनेता जेम्स लस्टेड आणि २७ वर्षीय शिक्षिका क्लो लुस्टने २०१६ साली लग्न केले. दोघेही यूकेमधील रहिवासी आहेत. याच वर्षी २ जून रोजी, त्यांनी विवाहित जोडप्यामधील उंचीच्या फरकाबाबत विक्रम मोडला. जेम्सची उंची १०९.३ सेमी (३ फूट ७ इंच) आहे आणि त्याची पत्नी क्लोची उंची १६६.१ सेमी (५ फूट ४ इंच) आहे. या जोडप्याच्या उंचीमध्ये अंदाजे २ फूटाचे अंतर आहे.

    अशी झाली भेट
    २०१२ साली एका स्थानिक पबमध्ये या दोघांची पहिली भेट घडली. या दोघांची ओळख त्यांच्या कॉमन मित्राने करून दिली होती. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले व ते एकमेकांना वरचेवर भेटत राहिले. पुढे २०१६ मध्ये दोघांचे लग्न झाले. आता या जोडप्याला ऑलिव्हिया नावाची एक मुलगी आहे, ती सुमारे दोन वर्षांची आहे. याबाबत क्लो म्हणाली की, आधी ती नक्कीच उंच पुरूषांकडे आकर्षित होत असे, मात्र जेम्सला भेटल्यानंतर तिचे जगच बदलले.अनुवांशिक डिसऑर्डरमुळे जेम्सची उंची वाढली नाही. त्याला डिस्ट्रॉफिक डिसप्लेसीया आहे. सुरुवातीला तो आपल्या भविष्याबाबत नेहमी चिंतेत असे. मात्र आता त्याला असे वाटते की, प्रत्येकासाठी कोणी ना कोणी असते.