पेरुमध्ये ऐतिहासिक इमारतीला आग, संपूर्ण इमारतीचा उरला फक्त मलबा, आंदोलकांची पोलिसांशी झटापट आणि…

ही इमारत 500 चौरस मीटरमध्ये पसरलेली होती. माध्यमांच्या अहवालानुसार, देशव्यापी संपादरम्यान राजधानी लिमा येथील जागतिक वारसा स्थळ प्लाझा सॅन मार्टिन जवळ हजारो लोक जमू लागले. या आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली.

    नवी दिल्ली – दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये राष्ट्राध्यक्ष डीना बुलेर्टो यांच्या विरोधात नागरिकांचे निदर्शने सुरू आहेत. या दरम्यान, एका ऐतिहासिक इमारतीचा मोठा भाग जळाला आहे. ही इमारत 500 चौरस मीटरमध्ये पसरलेली होती. माध्यमांच्या अहवालानुसार, देशव्यापी संपादरम्यान राजधानी लिमा येथील जागतिक वारसा स्थळ प्लाझा सॅन मार्टिन जवळ हजारो लोक जमू लागले. या आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. त्यादरम्यान ऐतिहासीक वास्तूला आग लागली.

    लिमा येथील प्लाझा सॅन मार्टिनजवळ राहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी गोळीबार केलेल्या अश्रुधुरामुळे ही आग लागली. आगीच्या वेळी उपस्थित असलेल्या एका मुलाने सांगितले की, पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यातील काही नळकांड्या इमारतीवरही पडल्या, त्यानंतर ही आग लागली.