A hot air balloon exploded in New Mexico, killing five people

अमेरिकेतल्या न्यू मॅक्सिकोतील अल्बुकर्के शहरात हॉट एअर बलून कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने फुगा हवेतच फुटला आणि वेगाने खाली पडला. त्यामुळे हॉट एअर बलूनमधून आनंद लुटणाऱ्या पाच जणांचा मत्यू झाला. यात पायलटसह तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यापैकी चार जणांचा मृत्यू जागीच झाला. तर एकाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    न्यू मॅक्सिकोत : अमेरिकेतल्या न्यू मॅक्सिकोतील अल्बुकर्के शहरात हॉट एअर बलून कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने फुगा हवेतच फुटला आणि वेगाने खाली पडला. त्यामुळे हॉट एअर बलूनमधून आनंद लुटणाऱ्या पाच जणांचा मत्यू झाला. यात पायलटसह तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यापैकी चार जणांचा मृत्यू जागीच झाला. तर एकाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    हॉट एअर बलूनमध्ये बसलेल्या व्यक्तींचे वय हे 40 ते 60 आसपास होते. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघातानंतर अल्बुकर्के शहरातील 13,777 ग्राहकांची वीज खंडीत झाली होती. जवळपास 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर वीज पुन्हा सुरु करण्यात यश आले.

    हॉट एअर बलूनला पुन्हा एकदा परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुर्घटना झालेल्या भागात न जाण्याची ताकीद देण्यात आली आहे. अल्बुकर्के शहरात दरवर्षी हॉट एअर बलून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात 9 दिवस हा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थिती लावतात.