
जगभरातील जहाजांच्या व्यापारी मार्गामध्ये अडचणी आल्या आहेत. या विशालकाय जहाजाला काढण्यासाठी चक्क छोट्या जेसीबीची मदत घेण्यात आली आहे. ज्याचा फोटो सोशलमीडियावर व्हायरल होताच, युजर्सने त्याचे मनोरंजनात्मक मीम्स बनवणे सुरू केले आहे.
मुंबई : इजिप्तच्या सुएझ कालव्यात (Suez Canal) एक एव्हरग्रीन नावाचे जहाज गेल्या तीन दिवसांपासून अडकले आहे. त्यामुळे जगभरातील जहाजांच्या व्यापारी मार्गामध्ये अडचणी आल्या आहेत. या विशालकाय जहाजाला काढण्यासाठी चक्क छोट्या जेसीबीची मदत घेण्यात आली आहे. ज्याचा फोटो सोशलमीडियावर व्हायरल होताच, युजर्सने त्याचे मनोरंजनात्मक मीम्स बनवणे सुरू केले आहे.
— Deeba Shadnia (@deebashadnia) March 24, 2021
सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजाला काढण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आला आहे. या महाकाय जहाजासमोर जेसीबी अगदी लहान आणि खेळण्यासारखे दिसत आहे. त्यामुळे या फोटोची सोशलमीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.सोशलमीडियावर या घटनेचा फोटो व्हायरल झाल्याने युजर्सने तुफान मीम्स बनवले आणि एकाहून एक क्रिएटीव्ह मीम्समुळे युजर्सचे मनोरंजन होत आहे