काश्मिरात दहशतवाद्यांच्या हाती आलं नवं हत्यार; आता ‘परफ्युम बॉम्ब’ने रचतायेत हल्ल्याचा कट, किती भयानक? घ्या जाणून…

काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) सर्वसामान्य नागरिक आणि भारतीय सैन्यदलाला दहशतवादी लक्ष्य करण्यासाठी दरवेळी निरनिराळ्या क्ल्युप्त्या लढवीत असतात. आता आता तर पाकिस्तानमधून ड्रोनच्या (Pakistan Drone) माध्यमातून दहशतवाद्यांना रसद (Terror Funding) आणि ड्रग्ज पोहवण्याचं काम सुरु करण्यात आलेलं आहे.

    श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) सर्वसामान्य नागरिक आणि भारतीय सैन्यदलाला दहशतवादी लक्ष्य करण्यासाठी दरवेळी निरनिराळ्या क्ल्युप्त्या लढवीत असतात. आता आता तर पाकिस्तानमधून ड्रोनच्या (Pakistan Drone) माध्यमातून दहशतवाद्यांना रसद (Terror Funding) आणि ड्रग्ज पोहवण्याचं काम सुरु करण्यात आलेलं आहे. त्यातच आता दहशतवाद्यांच्या हाती लागलेलं नवं हत्यार सैन्यदलाच्या हाती लागलेलं आहे.

    भारतीय सैन्यदलानं आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ‘परफ्युम आयईडी’ जप्त करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच अत्तराच्या बाटलीसारख्या छोट्या बाटलीत आयईडी सापल्याचं स्थानिक पोलिसांचं म्हणणं आहे. 21 जानेवारीला जम्मूत नरवालमध्ये झालेल्या स्फोटात अशाच परफ्यूम बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा संशय यंत्रणांना आहे. या प्रकरणात लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटकही करण्यात आली आहे.

    हा लष्करचा दहशतवादी सरकारी कर्मचारी असल्याचं भासवत होता. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून परफ्यूम बॉम्ब जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारचा आयईडी असलेला परफ्यूम बॉम्ब पहिल्यांदाच वापरण्यात आल्याचं स्थानिक सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे. 11 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना आरिफ अहमदला अटक करण्यात यश आलंय.