‘एका हातात कुराण, दुसर्‍या हातात अणुबॉम्ब, संपूर्ण जग नतमस्तक होईल’; गरिबी हटवण्यासाठी पाकिस्तानच्या कट्टरपंथी मौलानाची ‘जिहादी योजना’

पाकिस्तानात (Pakistan Crisis) मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय. त्यात परकीय चलनाचे (Foreign Currency) खातेही रिकामे होताना दिसत आहे. असे असताना आता इतर देश पाकिस्तानच्या अणुबॉम्बमुळे (Atomic Bomb) चिंतेत आहेत.

    इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan Crisis) मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय. त्यात परकीय चलनाचे (Foreign Currency) खातेही रिकामे होताना दिसत आहे. असे असताना आता इतर देश पाकिस्तानच्या अणुबॉम्बमुळे (Atomic Bomb) चिंतेत आहेत. जर पाकिस्तान एक देश म्हणून अपयशी ठरला आणि दहशतवादी संघटनांनी तेथे पाय रोवले तर मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रे चुकीच्या हातात पडू शकतात. त्याबाबत तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानचा (Tehreek-e-Labbaik Pakistan) नेता साद रिझवी (Hafiz Saad Hussain Rizvi) याने विधान केले आहे.

    पाकिस्तान हा कट्टरतावादी देश आहे. पाकिस्तानच्या कट्टरतावादी नेत्यांचे अणुबॉम्बबाबत काय हेतू आहेत, हे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये साद रिझवी म्हणतो, ‘सदर, वजीर-ए-आझम, लष्करप्रमुख आणि सर्व मंत्रिमंडळाला घेऊन पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी तुम्ही जगातील प्रत्येकाच्या दारात भीक मागत आहात. काही देतात तर काही नकार देतात आणि काही तुम्हाला त्यांच्या अटी मान्य करायला लावतात. आपण का जात आहात? ते म्हणाले- ‘देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आहे, आम्ही ती वाचवणार आहोत’.

    एकदा बाहेर पडा

    रिझवी पुढे म्हणाले, ‘एकदा बाहेर पडा, उजव्या हातात कुराण उचला आणि डाव्या हातात अ‍ॅटम बॉम्बचा बॉक्स उचला आणि मग कॅबिनेट घ्या… जर संपूर्ण विश्व तुमच्या पायाखाली येत नसेल, तर माझं नाव बदला.’

    दरम्यान, रिझवीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, याची खात्री होऊ शकली नाही. ट्विटरवर व्हिडिओ रिट्विट करताना, पाकिस्तानचे प्राध्यापक डॉ. मुक्तेदार खान यांनी शौक बहराइचीचा शेर लिहिला आहे.