नायजेरियात भीषणचा बसेस अपघात, आगीच्या भडक्यात ३७ प्रवासी ठार

नायजेरियामध्ये तीन बसेसचा भीषण अपघात झाला आहे. मैदुगुरी शहरात झालेल्या या दुर्घटनेत ३७ प्रवासी ठार झाले आहेत. दोन्ही बस वेगात असताना एका बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरुन येणाऱ्या बसवर आदळली. बस वेगात असल्याने अपघातानंतर आगीचा भडका उडाला होता.

    अबुजा – नायजेरियामध्ये (Nigeria) तीन बसेसचा भीषण (Buses Accident) अपघात झाला आहे. मैदुगुरी शहरात (Maiduguri) झालेल्या या दुर्घटनेत ३७ प्रवासी ठार झाले आहेत. दोन बसेसची समोरासमोर धडक झाल्यानंतर आगीचा (Fire) भडका उडाला. याचवेळी तिसऱ्या बसने अपघातग्रस्त बसेसना धडक दिली.

    दुर्घटनाग्रस्त दोन्ही बस विरोधी दिशेने प्रवास करत होत्या. दोन्ही बस वेगात असताना एका बसचालकाचे नियंत्रण सुटले (Bus Uncontrolled) आणि समोरुन येणाऱ्या बसवर आदळली. बस वेगात असल्याने अपघातानंतर आगीचा भडका उडाला होता.

    दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी तपास सुरु आहे.