रशियात नर्सिंग होमला भीषण आग, 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू

सध्या आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी काही प्रसारमाध्यमांनी इमारतीला गरम ठेवण्यासाठी स्टोव्हचा वापर केल्याचा दावा केला होता. त्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

    मॉस्को : रशिया-युक्रेन या दोन्ही देशात तणावाच परिस्थिती असताना रशियातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियामध्ये एक भीषण आगीची घटना घडली आहे. सायबेरियन शहरातील केमेरोवो येथील एका नर्सिंग होमला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने ही माहिती दिली

    मंत्रालयाच्या दिलेल्या माहिती नुसार, मॉस्कोच्या पूर्वेला 3,000 किमी अंतरावर असलेल्या केमोरोवो शहरातील दुमजली लाकडी इमारतीत शुक्रवारी रात्री उशिरा आग लागली. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

    सध्या आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी काही प्रसारमाध्यमांनी इमारतीला गरम ठेवण्यासाठी स्टोव्हचा वापर केल्याचा दावा केला होता. त्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नर्सिंग होमला आग लागली तेव्हा तिथे किती लोकं उपस्थित होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.