accident
accident

"हा अपघात 13 मार्च रोजी झाला. भारताच्या वाणिज्य दूतावासाची टीम मदतीसाठी मृत आणि जखमी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे.

    कॅनडाच्या टोरंटोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. व्हॅन आणि ट्रॅक्टर ट्रेलर यांच्या जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाल्याचं कळतं.

    कॅनडामधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या माहितीनुसार, “हा अपघात 13 मार्च रोजी झाला. टोरंटोजवळ झालेल्या या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन जखमी आहेत. टोरंटोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाची टीम मदतीसाठी मृत आणि जखमी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे.”