कोर्टात हजर होण्यासाठी निघालेल्या इमरान खान यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, अनेक जण जखमी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी लाहोरहून इस्लामाबादला जात असताना त्यांच्या ताफ्याला अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. इम्रान खान पूर्णपणे सुरक्षित असून ते इस्लामाबादच्या दिशेने जात आहेत. या अपघातात एक वाहन पूर्णपणे पलटी झाले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या बद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. इम्रान खान यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.  तोशखाना प्रकणी कोर्टात हजर राहण्यासाठी लाहोरहून इस्लामाबादच्यया दिशेने निघाले असता हा अपघात झाला. या अपघातात इम्रान खान पूर्णपणे सुरक्षित असून तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खानच्या ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळुन हा अपघात झाला. त्यापैकी एक वाहन पूर्णपणे उलटले. मात्र, माजी पंतप्रधान इम्रान खान हे अपघातात सामील असलेल्या दोन्ही वाहनांपैकी एकाही गाडीत नव्हते. तर या अपघातात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. इम्रान खान पूर्णपणे सुरक्षित असून ते इस्लामाबादच्या दिशेने जात आहेत. तोशाखाना प्रकरणात त्याची सुनावणी होणार आहे. यावेळी इम्रान यांच्यासोबत त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आहेत.

पोलीस अटक करायला आले होते

14 मार्च रोजी इस्लामाबाद पोलीस न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान खानला अटक करण्यासाठी लाहोरला गेले असता पीटीआय कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे 60 हून अधिक पोलीस जखमी झाले. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यात पीटीआयचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. इम्रान खानने या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सातत्याने ट्विट केले होते. त्यांनी एक फोटो ट्विट केला ज्यामध्ये टेबलावर मोठ्या प्रमाणात अश्रुधुराचे गोळे टाकण्यात आले होते.