पुलाच्या कठड्याला बस धडकली, दरीत कोसळली अनं जळून खाक, 39 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, अंगावर शहारा आणणारी दुर्घटना

बसमध्ये ४८ जण होते. अपघातानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले असून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

    पेरु मध्ये खडकाला आदळून बसचा मोठा अपघात (Pakistan Bus Accident) झाल्याची घटना ताजी असतानाच आता पाकिस्तानातुनही बस अपघाताची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान (balochistan) येथे हा अपघात झाला आहे.  लासबेला येथे प्रवाशांनी भरलेली हायस्पीड बस खोल नाल्यात पडली. या अपघातात 39 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बसने नाल्यात पडताच पेट घेतला. बस कराचीहून क्वेट्टाला जात होती.

    क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त हमजा अंजुम नदीम यांनी सांगितले की, बसमध्ये ४८ जण होते. त्यांनी सांगितले की, अपघातानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले असून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर जखमींना जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडल्याने बचाव कार्यात बचावकर्त्यांना खूप अडचणी आल्या आणि अंधारामुळे पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला.

    पेरुमध्येही अपघात

    उत्तर पेरूमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली.( Peru Bus Accident) 60 प्रवाशांना घेऊन जाणारी बस खडकावरून पडली आणि या दुर्देवी घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला. या बसमधील अनेक प्रवासी हे हैतीचे असल्याची माहिती आहे, कारण पेरूमध्ये हैतीयन स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या घटनेत या प्रवाशांनी जीव गमावल्याच बोललं जात आहे.