अभिनेत्रीने मुलाच्या 7 व्या वाढदिवसानिमीत्त काढला न्यूड फोटो, न्यायालयाने सुनावली 3 महिन्यांची शिक्षा

फोटो पाहून घानाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आणि अश्लील साहित्य पोस्ट केल्याचा आरोप केला, असे न्यूयॉर्क पोस्टने म्हटले आहे. न्यायाधीश रुबी आर्येती यांनी मूळ शिक्षा कायम ठेवली. या शिक्षेनंतर ब्राउनने इंस्टाग्रामवर लिहिले, बेटा आय लव्ह यू अँड गॉड इज विथ यू ऑलवेज यू नो. अभिनेत्री रोजमंड ब्राऊनला सुरुवातीला इतर स्टार्सचा पाठिंबा होता. ब्राउनला सुरुवातीला शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा मीडियामध्ये बरीच चर्चा झाली होती. रॅपर कार्डी बीसह सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया होत्या. त्यानंतर अनेक स्टार्सनी कोर्टाच्या निर्णयाला कठोर म्हटले होते. ghgossip.com नुसार, अभिनेत्री ट्रेसी बोके तीन महिने ब्राउनच्या मुलाची काळजी घेईल.

    मुलाचा वाढदिवस हा कोणत्याही आईसाठी सर्वात खास असतो. प्रत्येक आईची इच्छा असते आपल्या मुलासाठी काहीतरी करावे, ज्यामुळे त्याला खूप आनंद मिळेल. पण घानाच्या एका अभिनेत्रीने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही टीका होत आहे.

    घानामधील प्रसिद्ध अभिनेत्री रोजमंड ब्राऊन हिनं मुलाच्या वाढदिवशी त्याच्यासोबत न्यूड फोटोशूट केलं. 32 वर्षींची रोमा केवळ एवढंच करून थांबली नाही, तर याचे फोटोही तिनं सोशल मीडियावर शेअर केले. बघता बघता हे फोटो व्हायरल झाले आणि तिच्यावर सर्व बाजूंनी टीका व्हायला सुरुवात झाली. या फोटोत रोजमंड पूर्णतः नग्न असून तिच्या मुलाने केवळ अंडरविअर घातल्याचं दिसतं. घानाची ही अभिनेत्री अकुपेम पोलू या नावानेही प्रसिद्ध आहे.

    फोटो पाहून घानाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आणि अश्लील साहित्य पोस्ट केल्याचा आरोप केला, असे न्यूयॉर्क पोस्टने म्हटले आहे. न्यायाधीश रुबी आर्येती यांनी मूळ शिक्षा कायम ठेवली. या शिक्षेनंतर ब्राउनने इंस्टाग्रामवर लिहिले, बेटा आय लव्ह यू अँड गॉड इज विथ यू ऑलवेज यू नो.

    अभिनेत्री रोजमंड ब्राऊनला सुरुवातीला इतर स्टार्सचा पाठिंबा होता. ब्राउनला सुरुवातीला शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा मीडियामध्ये बरीच चर्चा झाली होती. रॅपर कार्डी बीसह सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया होत्या. त्यानंतर अनेक स्टार्सनी कोर्टाच्या निर्णयाला कठोर म्हटले होते. ghgossip.com नुसार, अभिनेत्री ट्रेसी बोके तीन महिने ब्राउनच्या मुलाची काळजी घेईल.