नववर्षात काबूलच्या लष्करी विमातळावर स्फोट, आत्मघातकी हल्ल्यात 10 जण ठार

तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 29 डिसेंबर देखील अफगाणिस्तानच्या तालुकन प्रांतात स्फोट झाला होता. ज्यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कखाली लावण्यात आलेल्या बॉम्बमुळे हा स्फोट झाला.

    नवी दिल्ली – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील लष्करी विमानतळावर रविवारी स्फोट झाला. या हल्ल्यात 10 जण ठार झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे. तर यात 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. तालिबानचे प्रवक्ते अब्दुल नफी टक्कूर यांनी या स्फोटाची माहिती दिली आहे. सकाळी हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.

    तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 29 डिसेंबर देखील अफगाणिस्तानच्या तालुकन प्रांतात स्फोट झाला होता. ज्यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कखाली लावण्यात आलेल्या बॉम्बमुळे हा स्फोट झाला. यापूर्वी 26 डिसेंबरला बदखशान प्रांतात झालेल्या स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.