Afghanistan should not be used to spread terrorism; Modi slapped China as well as Pakistan

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत(76th session of the United Nations General Assembly) पाकिस्तान आणि चीनला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कडक शब्दात ठणकावले. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी केला जाऊ नये. तुम्ही दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर केला तर तो तुमच्यासाठीही घातक ठरू शकतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला ठणकावले.

    वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत(76th session of the United Nations General Assembly) पाकिस्तान आणि चीनला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कडक शब्दात ठणकावले. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी केला जाऊ नये. तुम्ही दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर केला तर तो तुमच्यासाठीही घातक ठरू शकतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला ठणकावले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना हा इशारा दिला. मोदींनी हिंदीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. मोदी यांनी आपल्या तब्बल अर्ध्या तासाच्या भाषणात भारताची संस्कृती, परंपरा आणि मोदी सरकारने गेल्या सात वर्षात केलेल्या कामाची माहिती जगाला दिली. तसेच भारतासह जगावर आलेलं कोरोनाचं संकट आणि या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने दिलेलं योगदान यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवरून पाकिस्तान आणि चीनचं नाव न घेता या दोन्ही देशांचे कान उपटले.

    जो देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत, त्यांनीही हाच दहशतवाद त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो याचं भान ठेवावं, असं सांगतानाच अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होता कामा नये. त्यासाठी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे, असं आवाहन मोदींनी केलं. अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना आपली गरज आहे. त्यामुळे त्यांना मदत करणं हे आपलं दायित्व आहे, असंही ते म्हणाले.

    ७५ उपग्रह अंतराळात सोडणार

    जेव्हा निर्णय घ्यायची वेळ होती, तेव्हा ज्यांच्यावर जगाला उत्तर देण्याची जबाबदारी होती ते काय करत होते, असा प्रश्न आपल्या येणारी पिढी विचारेल. त्यामुळे विज्ञाला विकासाचा आधार बनाववेच लागेल. भारतात डिजीटल युगाची सुरूवात झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत ७५ सॅटेलाईट अंतराळात पाठवणार आहे. भारतीय विद्यार्थी हे सॅटेलाईट शाळा-महाविद्यालयात बनवत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.