हे काय केलं राव! ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला शेवटचं भेटायला बोलावलं अन् केला तिचा पंचनामा

ब्रेकअपनंतर ( Breakup) एखाद्याच्या भावना दुखावणे म्हणजे अच्छा सल्ला दिया तुने मेरे प्यार का.., असंच काहीतरी होत असतं. परंतु प्रेमात खलनायक बनून त्याचा काटा काढणे म्हणजे धक्कादायक... अशीच एक ब्रेकअपची घटना (Incident) समोर आली आहे.

रिलेशनशीप ( Relationship ) म्हटलं की ब्रेकअप, पॅचअप या सर्व गोष्टी येतच असतात. हे काही नवीन नाही. तसेच ब्रेकअपनंतर प्रत्येकाच्या भावना आणि इच्छा वेगवेगळ्या असतात. काही जण पार्टनरवर ( partner) आपला राग व्यक्त करतात. ब्रेकअपनंतर ( Breakup) एखाद्याच्या भावना दुखावणे म्हणजे अच्छा सल्ला दिया तुने मेरे प्यार का.., असंच काहीतरी होत असतं. परंतु प्रेमात खलनायक बनून त्याचा काटा काढणे म्हणजे धक्कादायक… अशीच एक ब्रेकअपची घटना समोर आली आहे.

ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचा बदला घेण्यासाठी एक्स पार्टनरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोराचं नाव मार्क मॅकलिन असं आहे. प्रेयसीने या मुलासोबत ४ महिन्यांचे संबंध तोडल्यामुळे त्याने आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर वार केले आहेत. तरूणीचे वय हे १९ वर्ष आहे, तर तरूणाचे वय हे ३२ वर्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांची भेट ऑनलाईनच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर चार महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या तरूणीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ब्रेकअपनंतर मार्कने या तरूणीला एकदा भेटण्याची विनंती केली. याच संधीचा फायदा घेत बदला घेण्यासाठी मार्कने या तरूणीवर चाकूने वार केले.

दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून तरूणीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, सोशल मीडियावर या तरूणीचे फोटो व्हायरल झाले आहेत.