‘या’ प्राणी संग्रहालयातील सर्व वाघ-सिंहांना कोरोनाची लागण

या प्राणी संग्रहालयातील ६ सिंह, एक सुमात्रा वाघ आणि २ बिबट्यांच्या जबड्यातील स्राव तपासणीस घेण्यात आले होते. त्यामध्ये या सर्व पशूंना करोनाची लागण होऊन गेली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला गेला आहे.

    वॉशिंग्टन: जगावरील कोरोनाचे सावट अद्याप संपूर्ण संपलेले नाही. माणसांनंतर आता प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनियान्स नॅशनल पार्क मधील सर्व वाघ-सिंहांना करोनाची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त आहे. या सर्व वाघ-सिंहांच्या प्राथमिक चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती एका निवेदनात देण्यात आली आहे. स्मिथसोनियान्स नॅशनल पार्क हे अमेरिकेतील सर्वात जूने प्राणि संग्रहालय आहे.

    या प्राणी संग्रहालयातील ६ सिंह, एक सुमात्रा वाघ आणि २ बिबट्यांच्या जबड्यातील स्राव तपासणीस घेण्यात आले होते. त्यामध्ये या सर्व पशूंना करोनाची लागण होऊन गेली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला गेला आहे. या चाचणीचे अंतिम अहवाल अद्याप मिळणे बाक आहे. आणि त्यासाठी आणखीन काही दिवस थांबायला लागणार आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.