worlds largest iphone

अमेरिकन यूट्यूबवर मॅथ्यू बीमने Apple च्या सर्वात महागड्या फोन iPhone 14 Pro Max चं मॉडेल तयार केलं आहे. याची लांबी 8 फूट आहे.

    जगात सध्या आयफोनची (iPhone) खूप क्रेझ आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक आयफोन बघितले असतील पण तुम्ही 8 फूट उंचीचा माणसाच्या उंचीपेक्षाही मोठा आयफोन बघितलाय का? सध्या सोशल मीडियावर या जगातल्या सगळ्यात मोठ्या आयफोनचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल
    एका पठ्ठ्यानं8 फूट उंचीचा सर्वात मोठा आयफोन बनवला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा 8 फुटाचा सर्वात मोठा आयफोन फक्त शोभेसाठी नाहीये. तर हा मोठा आयफोन सर्वसाधारण आयफोनप्रमाणे व्यवस्थित काम करतो. याचा व्हिडिओ यूट्यूबवर वेगाने व्हायरल झाला आहे.

    अमेरिकन यूट्यूबरचा पराक्रम
    अमेरिकन यूट्यूबवर (YouTuber) मॅथ्यू बीमने (Matthew Beem) Apple च्या सर्वात महागड्या फोन iPhone 14 Pro Max चं मॉडेल तयार केलं आहे. याची लांबी 8 फूट आहे. YouTuber मॅथ्यू बीमने हा फोन एका कारमध्ये ठेवला आणि त्याचे फिचर्स आणि रिव्ह्यू पाहण्यासाठी तो न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर नेला. या डिव्हाइसच्या डिस्प्लेसाठी टेलिव्हिजनच्या टच-स्क्रीनचा वापर करून मॉडेल तयार करण्यात आलं आहे आणि हा मॅक मिनीला जोडण्यात आलाय.

    कशी होती प्रक्रिया?
    बीमने या भल्या मोठ्या आयफोनमध्ये गाणी ऐकताना व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी बटणंही जोडली आहेत. बीमने त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये एवढा मोठा आयफोन बनवण्याची प्रक्रिया शेअर केली आहे. त्यांनी सांगितलं की, मजबूत धातूची फ्रेम तयार करण्यात आली होती. यामुळे हा आयफोन बनवण्यात मदत झाली. YouTuber नंतर iPhone डिव्हाइसला मॅट फिनिश केल्याचं दिसत आहे.

    आयफोनमध्ये कोणते फिचर्स?
    या सर्वात मोठ्या आयफोनमध्ये साधारण आयफोनमधील सर्व फिचर नाहीत. हा फोन तयार करताना टीव्हीच्या टच स्क्रिन वापरण्यात आला आहे. याला मिनी मॅक जोडण्यात आला आहे. या आयफोनमध्ये लॉक बटण, आवाज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीही बटण जोडण्यात आलं आहे.

    गेमिंग आणि व्हिडीओ कॉल शक्य
    रिव्हयू करताना बीम या आयफोनवर व्हिडीओ गेम खेळताना दिसला. त्याने फोटो काढले इतकंच नाही तर भारतातील एका मित्रासोबत व्हिडिओ कॉलवरून संवादही साधला. सध्या हा 8 फूट आकाराच्या आयफोननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा आठ फूट आकाराचा आयफोन बीमने न्यूयॉर्कच्या रस्त्यावर नेला आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.