चीन-तैवान वादावरून अमेरिकेची भूमिका स्पष्ट; तणाव आणखी वाढणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना मुलाखतीत तैवानबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करणार का, असे विचारले असता त्यांनी होय असे उत्तर दिले. तैवानवर अभूतपूर्व हल्ला झाल्यास अमेरिका त्यांचे संरक्षण करेल, असे बायडन यांनी सांगितले.

    वॉशिंग्टन : चीन आणि तैवानमध्ये तणावाची स्थिती आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी तैवानवर हल्ला (Taiwan) झाल्यास अमेरिकन सैन्य (US Army) त्यांचे संरक्षण (Protection) करेल, अशी स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या भूमिकेमुळे तैवानची ताकद वाढली असून चीनला (China) इशारा मानला जात आहे.

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना मुलाखतीत तैवानबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करणार का, असे विचारले असता त्यांनी होय असे उत्तर दिले. तैवानवर अभूतपूर्व हल्ला झाल्यास अमेरिका त्यांचे संरक्षण करेल, असे बायडन यांनी सांगितले.

    अमेरिकेची तैवानच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका आहे. मात्र, बायडन यांनी त्यावर अधिकच स्पष्ट भूमिका घेतली आहे. यामध्ये अमेरिकन सैन्य तैवानच्या भूमीवर उतरू शकणार आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनीदेखील अमेरिकेचे तैवानबाबत असलेल्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले.