पाकिस्तानी खासदार आणि टीव्ही होस्ट अमीर लियाकत हुसैन यांचे निधन झाले आहे. आमिर लियाकत त्याच्या घरात बेशुद्धावस्थेत सापडल होते. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. उपपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला(Amir Liaqat Hussain Death).

बुधवारी रात्री आमिर यांची तब्येत अचानक बिघडली. मात्र त्याने हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला. यानंतर थोड्याच वेळात ते बेशुद्ध झाले. तात्काळ त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
आमिर लियाकत भारतातही खूप लोकप्रिय आहेत. मीम्समधील त्यांच्या रिएक्शनमुळे ते प्रसिद्ध झाले आहेत. आमिर त्यांच्या टाळ्या देण्याच्या शैलीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आमिर यांनी याआधी होस्ट म्हणून आपली छाप पाडली होती. 2001 मध्ये आमिरने जिओ टीव्ही जॉईन केला. तेथे तो अलीम ऑनलाइन हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असे. या काळात त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.
गेल्या काही वर्षांपासून आमिर जिओ टीव्ही आणि बोल न्यूजसाठी रमजान ट्रान्समिशन होस्ट करत होते. शेवटच्या वेळी ते ‘बोल हाउस’ नावाच्या शोमध्ये होस्ट म्हणून दिसले होते.
आमिर राजकारणातही खूप सक्रिय होते. मार्च 2018 मध्ये त्यांनी पीटीआय पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर निवडणुकीनंतर ते कराचीमधून खासदार म्हणून निवडून आले. आमिर काही वर्षे मीडिया इंडस्ट्रीतही काम केले.
आमिर लियाकत सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. इन्स्टाग्रामवर त्यांना 6 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे. त्याच वेळी, ट्विटरवर त्यांचे 1.2 दशलक्ष फॉलोअर्स होते.
आमिर यांचा जन्म 1972 साली कराची, पाकिस्तानमध्ये झाला. नुकतेच ते तिसरे लग्न आणि घटस्फोटामुळे खूप चर्चेत होते.