अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत स्फोट; २१ जणांचा मृत्यू

काबूलमधील एका मशिदीत बॉम्बस्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले आहेत. यामध्ये ५ लहान मुलांचा समावेश आहे. खैरखाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला.

    काबुल : काबूलमधील (Kabul) एका मशिदीत बॉम्बस्फोटात (Mosque Bomb Blast) २१ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले आहेत. यामध्ये ५ लहान मुलांचा समावेश आहे. खैरखाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला. काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी सांगितले की, काबूलच्या पीडी १७ येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाला असून आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

    काबुलमध्ये असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये शिया मशिदींना (Shia Mosque) लक्ष्य केले आहे. मात्र, आज झालेला स्फोट शिया भागात झालेला नाही. अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सध्या तालिबानचे सरकार (Taliban Government) असून या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अश्रफ घनी (Ashraf Ghani) यांचे सरकार हटवल्यानंतर तालिबानने तेथे ताबा मिळवला. २९ एप्रिल रोजी, काबूलमधील मशिदीमध्ये धार्मिक विधी करत असलेल्या अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करण्यात आलेल्या हल्ल्यात १० लोक मारले गेले.