लंडनमध्ये मांस देणाऱ्या रेस्तरॉंमध्ये गोंधळ, स्टाफने प्राणीप्रेमींना उचलून बाहेर फेकले

'अ‍ॅनिमल रिबेलियन'च्या सदस्यांनी सोशल मीडिया पोस्टवर लिहिले - आमच्या सदस्यांना लंडनमधील नुसर-एट रेस्तरॉंमधून बाहेर काढण्यातआले. हे रेस्तरॉं मांस आणि मांसाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. लोकांना अशा प्रकारचे अन्न देणे म्हणजे प्राण्यांचे शोषण आहे. त्यामुळे पर्यावरणालाही धोका आहे. ही शाश्वत अन्न व्यवस्था नाही.

    नवी दिल्ली – लंडनमधील एका रेस्तरॉंमध्ये काही प्राणीप्रेमींनी घुसून गोंधळ घातला. त्यानंतर रेस्तरॉंच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उचलून बाहेर काढले. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, आंदोलक लंडनच्या नाइट्सब्रिजमधील नुसर-एट (Nusr-Et) रेस्तरॉंमध्ये घुसले आणि निदर्शने केली.

    तुर्कीचे प्रसिद्ध शेफ नुसरेत गोकसे (Nusret Gokce) हे लग्झरी रेस्तरॉं Nusr-Etचे मालक आहेत. प्राणी आणि हवामान न्याय गटाच्या ‘अ‍ॅनिमल रिबेलियन’च्या सदस्यांनी येथे निदर्शने केली. त्यानंतर रेस्तरॉंच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. या ग्रुपने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये कर्मचारी आंदोलकांना बाहेर काढताना दिसत आहेत.

    ‘अ‍ॅनिमल रिबेलियन’च्या सदस्यांनी सोशल मीडिया पोस्टवर लिहिले – आमच्या सदस्यांना लंडनमधील नुसर-एट रेस्तरॉंमधून बाहेर काढण्यातआले. हे रेस्तरॉं मांस आणि मांसाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. लोकांना अशा प्रकारचे अन्न देणे म्हणजे प्राण्यांचे शोषण आहे. त्यामुळे पर्यावरणालाही धोका आहे. ही शाश्वत अन्न व्यवस्था नाही.

    दुसर्‍या पोस्टमध्ये, ग्रुपने लिहिले – आमचे सदस्य शांततेत काम करत होते. कारण आलिशान जेवणातून समाजातील विषमता दिसून येते. ब्रिटनमध्ये महागाई वाढत आहे. येथे हवामान आणि पर्यावरणीय संकटे आहेत. असे असूनही श्रीमंत लोक आलिशान जेवणावर पैसे खर्च करत आहेत.