मलेशियाच्या पंतप्रधानपदी अन्वर इब्राहिम, आज घेणार शपथ

मलेशियाचे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी मलेशियाचे विरोधी पक्षनेते अन्वर इब्राहिम यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. सुलतानच्या या घोषणेने देशातील सार्वत्रिक निवडणुकीनंतर अनेक दिवसांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ संपली आहे. सुलतान यांनी सांगितले आहे की, नवीन पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा आजच पार पडणार आहे.

    क्वालालंपूर – अन्वर इब्राहिम यांची (Anwar Ibrahim) मलेशियाच्या पंतप्रधानपदी (Prime Minister) नियुक्ती करण्यात आली आहे. मलेशियाच्या (Malaysia) राजे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह (King Sultan Abdullah Ahmad Shah) यांनी याबाबत घोषणा केली. मलेशियामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापनेवर प्रश्नचिन्ह होता.

    मलेशियाचे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी मलेशियाचे विरोधी पक्षनेते अन्वर इब्राहिम यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. सुलतानच्या या घोषणेने देशातील सार्वत्रिक निवडणुकीनंतर अनेक दिवसांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ संपली आहे. सुलतान यांनी सांगितले आहे की, नवीन पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा आजच पार पडणार आहे.

    राजे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी सांगितले की, आज संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधानपदाचा शपथविधी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, शनिवारच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षामध्ये स्पष्ट बहुमत नव्हते. यामुळे संसदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. यामधील एका गटाचे नेतृत्व अन्वर इब्राहिम हे करत होते आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व माजी पंतप्रधान मुहिद्दीन यासिन (Muhyiddin YassinI) यांच्याकडे होते.