Should Ayurvedic doctors perform surgery? The Supreme Court questioned the Centre's question of patient health

कोणत्याही देशामध्ये किंवा शहरामध्ये स्थायिक होण्यासाठी त्या त्या ठिकाणी लागू असलेल्या नियमांची पूर्तता करणे बंधनकारक असते. त्यानंतरच त्या ठिकाणी स्थायिक होण्याची औपचारिक परवानगी मिळविता येते. पण एका विशिष्ट गावामध्ये स्थायिक होण्यासठी मात्र शस्त्रक्रिया करवून घेऊन अपेंडिक्स काढून घेणे गरजेचे आहे(Appendix surgery has to be done before settling in this village). ही गोष्ट अविश्वसनीय वाटत असली, तरी अगदी खरी आहे.

    ‘विलास लास अॅस्त्रेला’ हे अतिशय मर्यादित मानवी वस्ती असणारे अंटार्क्टिका येथील लहानसे गाव आहे. या गावामध्ये स्थायिक होण्याची इच्छा असणाऱ्यांना शस्त्रक्रिया करवून घेऊन शरीरातील अपेंडिक्स हा अवयव काढून टाकावा लागतो. या विचित्र नियामामागे कारणही तसेच आहे. या लहानशा गावामध्ये केवळ शे-दोनशे लोक राहतात. यातील बहुसंख्य लोक चिली देशाच्या वायुसेनेचे किंवा नौसेनेचे कर्मचारी आहेत.

    यातील काही लोक वैज्ञानिकही आहेत. हे सर्व लोक एकमेकांसोबत अतिशय गुण्यागोविंदाने रहात असून, गावामध्ये राहणाऱ्या कोणालाही कोणतीही अडचण आल्यास सर्व जण मिळून सहकार्य करीत अडचणींवर मात करीत असतात. या गावाच्या आसपास दुसरी कोणतीही वस्ती नाहीच. बहुतेक वेळी बर्फाची चादर पांघरलेल्या या गावामध्ये शीत ऋतूमध्ये पारा -47 अंशाच्या देखील खाली उतरतो.

    या गावामध्ये एक सुपरमार्केट, एक शाळा आणि एक पोस्ट ऑफिस आहे. तसेच पैश्यांच्या देवाण-घेवाणीकरिता एक बँक आणि एक इस्पितळ देखील आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांच्या प्राथमिक गरजा भागतील अश्या सर्व सोयी येथे आहेत असे म्हणायला हरकत नाही. मग अपेंडिक्स काढून टाकण्याचा नियम का? तर या गावामध्ये इस्पितळ असले, आणि या इस्पितळामध्ये डॉक्टर असले, तरी शस्त्रक्रिया करू शकणारे सर्जन मात्र या इस्पितळामध्ये उपलब्ध नाहीत.

    अपेंडिक्स हा अवयव फारसा उपयोगी नसल्याने आणि तो काढून टाकल्याने मानवी जीवाला कोणताही धोका उद्भविण्याची शक्यता कमी असल्याने, त्यापासून काही त्रास उद्भविण्याआधीच हा अवयव शरीरातून काढून टाकणे चांगले अशी मान्यता असल्याने या गावामध्ये स्थायिक होण्यापूर्वी ही शस्त्रक्रिया करवून घेतली जाते.