अल कायदाकडून पाकिस्तानी कमांडरसह सहा जणांची हत्या; बलुचिस्तानात हेलिकॉप्टर पाडले

अल जवाहिरीच्या हत्येत पाकिस्तानचा हात असल्याचे समजताच अल कायदा आणि तालिबानने आयएसआयसह पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. अल कायदाने पाकिस्तानी कमांडरला हेलिकॉप्टरसह उडवले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टरने लेफ्टनंट जनरल सरफराजसोबत इतर अधिकारी होते. अल कायदाने या हेलिकॉप्टरला बलूचिस्तानमध्ये उडवले.

    इस्लामाबाद : कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा (Al Qaeda) प्रमुख अयमान अल जवाहिरीचा (Al Zawahiri) अमेरिकेने खात्मा केला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये अल जवाहिरीला ड्रोन हल्ला करून ठार केले. त्यानंतर अल कायदा संघटनेने अल जवाहिरीच्या मृत्यूचा बदला घेतला. इसिसशी (ISI) संबंध असलेला पाकिस्तानी कमांडर सरफराज (Pakistani Commander Sarfaraz) याची हत्या केली आहे.

    अल-जवाहिरीचा खात्मा करण्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने पैसे घेऊन अल जवाहिरीला मारले असून त्यामुळे आता अल कायदाने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. तालिबानने अल जवाहिरीच्या मृत्यूचा निषेध करत अमेरिकेवर टीका केली. तालिबान सरकार दहशतवादी संघटना अल कायदाला पूर्ण समर्थन देते. अल जवाहिरी हा याआधी पाकिस्तानमध्ये लपला होता. मात्र, तालिबानचे सरकार आल्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये परतला. त्यातच अमेरिकेने तालिबानमध्ये घुसून अल जवाहिरीचा खात्मा केला.

    अल जवाहिरीच्या हत्येत पाकिस्तानचा हात असल्याचे समजताच अल कायदा आणि तालिबानने आयएसआयसह पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. अल कायदाने पाकिस्तानी कमांडरला हेलिकॉप्टरसह उडवले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टरने लेफ्टनंट जनरल सरफराजसोबत (Lt Gen Sarfaraz) इतर अधिकारी होते. अल कायदाने या हेलिकॉप्टरला बलूचिस्तानमध्ये उडवले. यामध्ये कमांडर सरफराज यांचा मृत्यू झाला आहे.