astronot

सध्या ISS मध्ये एक अ‍ॅस्ट्रोनॉट अमेरिकन आहे. जस ISS रिकामं करण्याची वेळ आली तर अमेरिकी कॉस्मोनॉटला परत जावं लागेल. मात्र तो रशियन अंतरिक्ष यानासोबत (Space Accidents) परत येणार नाही, तर अमेरिका त्याच्यासाठी वेगळं स्पेसक्राफ्ट पाठवणार आहे. अवकाशात आजवर अनेक अपघात (Astronauts accident) झाले आहेत. अनेक अंतराळवीर परत आलेले नाही.

  अंतराळात जाण्याआधी अंतराळवीरांना (Astronauts)  ट्रेनिंग दिलं जातं. अवकाशात जाण्यासाठी ते फिट आहेत की नाही हे तपासलं जातं. स्पेसक्राफ्टवरही पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. कोणतीही चूक होऊ नये म्हणून स्पेसक्राफ्टचीही (Spacecraft) वारंवार तपासणी केली जाते. मात्र इतकं सगळं करुनही धोका टळतो असं अजिबात नाही. अनेकवेळा अ‍ॅस्ट्रोनॉट्सचा अंतराळात मृत्यू झाला आहे.

  युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरु आहे. या युद्धात आकाशातून झालेल्या हल्ल्यांमुळे तणार आहे. डिसेंबरमध्ये इंटरनेशनल स्पेस स्टेशन (ISS) शी निगडीत रशियन स्पेसक्राफ्ट सोयूज एमएस-22 मध्ये तांत्रिक बिघाड झाला. आता या अंतरिक्ष यानातून रशियन अ‍ॅस्ट्रोनॉट्स परत येऊ शकत नाहीत. त्यांना आणण्यासाठी रशिया स्पेसक्राफ्ट पाठवणार आहे.

  सध्या ISS मध्ये एक अ‍ॅस्ट्रोनॉट अमेरिकन आहे. जस ISS रिकामं करण्याची वेळ आली तर अमेरिकी कॉस्मोनॉटला परत जावं लागेल. मात्र तो रशियन अंतरिक्ष यानासोबत परत येणार नाही, तर अमेरिका त्याच्यासाठी वेगळं स्पेसक्राफ्ट पाठवणार आहे. अवकाशात आजवर अनेक अपघात झाले आहेत. अनेक अंतराळवीर परत आलेले नाही.

  कोणते धोके ?
  पृथ्वीपेक्षा अंतराळातली जागा जास्त धोकादायक आहे. कारण तिथे ग्रॅव्हिटी नसल्याने संतुलनासाठी मेंदू आणि शरीर वेगळ्या पद्धतीने काम करतं. अनेक वर्ष माणसावर हा प्रभाव राहतो. दुसरी समस्या आहे तिथलं रेडिएशन. अवकाशाचं तापमान नसतं मात्र यातील ग्रह, सॅटेलाईट यामुळे तापमान तयार होतं. त्यामुळे तिथे कायम भयानक रेडिएशन असतं. रेडिएशन स्पेसच्या तापमानाला -200 फॅरनहाइट पासून +300 डिग्री फॅरनहाइटपर्यंत नेत असतं. त्यामुळेत अंतराळवीरांना सुरक्षेचा विचार करुन पाठवलं जातं. ते एका प्रकारच्या इन्सुलेटरमध्ये राहतात जेणेकरून कोणत्याही फोर्सचा कमी प्रभाव पडेल.

  तरीही होतात अपघात
  अवकाशातले काही अपघात जीवावर बेततात. आजवर 550 च्या आसपास अ‍ॅस्ट्रोनॉट्स आणि कॉस्मोनॉट्सनी अंतराळाची सफर केली आहे. यातील तिघांचा अवकाशात मृत्यू झाला आहे, तर 30 पेक्षा जास्त लोक खतरनाक स्पेस-ट्रॅव्हलच्या ट्रेनिंगमध्ये मृत्यूमुखी पडले.

  कॉस्मोनॉटचा दुर्दैवी मृत्यू
  व्लादिमीर कोमारोव नावाचा एक अंतरिक्ष यात्री अवकाशातून खाली पडला होता. मॉस्कोमध्ये जन्मलेला आणि सोवियत सेनेत काम केलेल्या कोमारोवने पुढे जाऊन स्पेस इंजीनियरिंगचे ट्रेनिंग घेतलं आणि तो अंतराळात गेला. तो दुसऱ्या जागतिक युद्धाचा काळ होता, जेव्हा रशिया (तेव्हाचा सोवियत संघ) च्या विरुद्ध अमेरिकेसोबत संपूर्ण यूरोप होता. अवकाश मोहिमेत स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान रशियासमोर होतं. तेव्हाच एक योजना आखण्यात आली.

   स्पेस-वॉकचा प्लॅन
  रशियाने 1967 मध्ये कम्युनिस्ट क्रांतीच्या दिवशी एक वेगळा प्लॅन केला. यात कोमारोव सहभागी होते. त्यांना अन्य एका माणसासोबत स्पेस वॉक करायचा होता. त्याचवेळी योजनेसाठी बनवण्यात आलेल्या स्पेसक्राफ्टमध्ये Soyuz 1 मध्ये अनेक समस्या जाणवू लागल्या. एका अ‍ॅस्ट्रोनॉटने  मिशनच्या आधी माघार घेतली उरले कोमारोव. त्यांना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून परत येण्यास सांगण्यात आलं.

  पॅराशूट झालं फेल
  एप्रिल 1967 मध्ये कोमारोव अंतराळावरच्या सफरीवर निघाले. त्यांनी 24 तासांच्या आत 16 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली, माक्ष परत येताना त्यांचं स्पेसक्राफ्ट खराब झालं. तोपर्यंत ते पृथ्वीच्या कक्षेत आले होते. साधारण 23 हजार फूट उंचावर आल्यावर पॅराशूटने त्यांनी खाली येणं अपेक्षित होतं, मात्र पॅराशूटचे दोरे गुंतल्याने ते होऊ शकलं नाही आणि कोमारोव यांचा मृत्यू झाला.

  वारंवार अपघात
  जानेवारी 1967 मध्ये एका प्रॅक्टिस रनच्या वेळी अपोलो 1 मध्ये आग लागली, ज्यात तीन अंतराळवीर गस ग्रिसम, एड वाइट आणि रॉजर शेफे यांचा मृत्यू झाला. वीजेच्या वायरिंगमध्ये आग लागल्याने तिघांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला,मात्र आग आणि धुराच्या लोळात त्यांचा मृत्यू झाला.