युक्रेनसोबतच्या युद्धात आत्तापर्यंत १३५१ रशियन सैनिकांचा मृत्यू, ३८२५ जखमी, तर मारियूपोलमध्ये रशियाचे हल्ले सुरुच

रशियन सैन्याच्या उप प्रमुखांकडून जारी करण्यात आलेल्या या माहितीच्या आधारानुसार, आत्तापर्यंत युक्रेन युद्धात रशियाचे १३५१ सैनिक ठार झाले आहेत. तर ३८२५ सैनिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

    कीव : रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा ३० वा दिवस होता. आज रशियन सैनिकांनी खार्किवच्या एका आरोग्य केंद्रावर हल्ला केला. यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. एका महिन्यापासून सुरु असलेल्या या युद्धात पहिल्यांदाच रशियाने अधिकृतरित्या किती सैनिकांचे नुकसान झाले याची आकडेवारी आज दिली आहे.

    रशियन सैन्याच्या उप प्रमुखांकडून जारी करण्यात आलेल्या या माहितीच्या आधारानुसार, आत्तापर्यंत युक्रेन युद्धात रशियाचे १३५१ सैनिक ठार झाले आहेत. तर ३८२५ सैनिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

    दुसरीकरडे अमेरिकेचे राष्टाध्यक्ष जो बायडेन यांनी या संकटावर गुरुवारी ब्रुसेल्समध्ये नाटो समिटला संबोधित केले. यात बायडेन यांनी रशइयाला थेट इशाराच दिला आहे. पुतीन यांनी जर रासायनिक अस्त्रांचा वापर युक्रेन विरोधात केला तर त्यांना नाटो देशांचे सैन्य उत्तर देईल. अशी स्पष्ट भूमिका बायडेन यांनी मांडलेली आहे. रशिया जी अस्त्रे वापरेल, तशाच स्वरुपाची अस्त्रे नाटोकडूनही वापरण्यात येतील, असेही बायडेन यांनी स्पष्ट केले आहे.