मोरोक्को-स्पेन सीमेवर चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू

मोरोक्कन सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, लोकांनी लोखंडी गजांवरुन चढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी, मेलिला येथील स्पॅनिश सरकारी कार्यालयाच्या वतीने दोन हजारपेक्षा अधिक लोकांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना स्पॅनिश सिव्हिल गार्ड (Spanish Civil Guard) आणि मोरोक्कन सिक्युरिटीने (Moroccan Security Guard) थांबवले.

    आफ्रिकन देश मोरोक्को (Morocco) सोडून स्पेनमध्ये (Spain) प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना १८ स्थलांतरितांचा मृत्यू (Death Of Migrants) झाला आहे. तसेच, ७६ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये मोरक्कोचे सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मोरोक्कोच्या उत्तर आफ्रिकन एन्क्लेव्ह मेलिलाला लागून असलेल्या मोरक्कन सीमेवर चेंगराचेंगरीत (Stampede) हा अपघात झाला.

    मोरोक्कन सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, लोकांनी लोखंडी गजांवरुन चढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी, मेलिला येथील स्पॅनिश सरकारी कार्यालयाच्या वतीने दोन हजारपेक्षा अधिक लोकांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना स्पॅनिश सिव्हिल गार्ड (Spanish Civil Guard) आणि मोरोक्कन सिक्युरिटीने (Moroccan Security Guard) थांबवले.

    सीमेच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा रक्षकांचा कडक बंदोबस्त असतानाही १३३ स्थलांतरित सीमा ओलांडण्यात यशस्वी झाले. या अपघातातच ५ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दुसरीकडे, मोरक्कन मानवाधिकार गटाने २७ लोक मारले गेल्याचे म्हटले आहे. दरम्यान, गरिबी आणि हिंसाचारामुळे लोक मोरोक्कोमधून स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी मार्चमध्ये ३५०० मोरोक्कन लोकांनी स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुमारे एक हजार लोकांना यात यश आले होते.