म्हणून अटलबिहारी वाजपेयी इंदिरा गांधींना ‘दुर्गेचा अवतार’ म्हणाले

१९७१ साली पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतानं विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या ९३ हजार सैन्यानं भारतीय सैन्यापुढं आत्मसमर्पण केलं होतं. लोकसभेत भारत-पाकिस्तान युद्धाबाबत चर्चा सुरू होती. एक पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींच्या कार्याचा वाजपेयी गौरव करत होते. वाद बाजूला ठेऊन आपल्याला इंदिरा गांधींच्या भूमिकेचा गौरव केला पाहिजे, जी एखाद्या दुर्गा देवीप्रमाणे होती, असे उद्गार अटल बिहारी वाजपेयी यांनी काढले. आपल्या या गौरवोद्गारांनी अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

ही गोष्ट आहे १९७१ सालची. तत्कालीन जनता पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. अटलजींनी एका भाषणादरम्यान इंदिरा गांधींना दुर्गेची उपमा दिली होती. १९७१ च्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या संदर्भात वाजपेयींनी इंदिरा गांधींबद्दल हे गौरवोद्गार काढले होते.

१९७१ साली पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतानं विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या ९३ हजार सैन्यानं भारतीय सैन्यापुढं आत्मसमर्पण केलं होतं. लोकसभेत भारत-पाकिस्तान युद्धाबाबत चर्चा सुरू होती. एक पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींच्या कार्याचा वाजपेयी गौरव करत होते. वाद बाजूला ठेऊन आपल्याला इंदिरा गांधींच्या भूमिकेचा गौरव केला पाहिजे, जी एखाद्या दुर्गा देवीप्रमाणे होती, असे उद्गार अटल बिहारी वाजपेयी यांनी काढले. आपल्या या गौरवोद्गारांनी अटल बिहारी वाजपेयींनी भारतीय राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

प्रकरण काय होतं?

जेव्हा पूर्व पाकिस्तानातील बंगाली नागरिकांवर पाकिस्तानकडून होणारे अत्याचार वाढू लागले, तेव्हा इंदिरा गांधींनी धाडसी पावलं उचलली. या ठिकाणच्या हिंदु अल्पसंख्याकांवरचे अत्याचार संपता संपत नव्हते. १ कोटी हिंदू नागरिकांना संपवण्याचा विडाच जणू पाकिस्तानचे जनरल टिक्का खान यांनी उचलला होता. 

इंदिरा गांधींचा धाडसी निर्णय

पंतप्रधान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करत होत्या. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. २७ मार्च १९७१ या दिवशी इंदिरा गांधींनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळानं या निर्णयाला समर्थन दिलं. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध पेटलं. या युद्धाच्या काळात ज्या धैर्यानं पंतप्रधान इंदिरा गांधींनी निर्णय घेतले, त्याबद्दल अटल बिहारी वाजपेयींनी राजकीय विरोध बाजूला ठेवत मनापासून गौरवोद्गार काढले होते.