Firing of youth after being fired
Firing of youth after being fired

अमेरिकन सीमेजवळील(Border Of America) मेक्सिकन सिटीच्या रेनोसामध्ये वाहनांवर सवार हल्लेखोरांनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार (Attacks by armed gunmen) केला.

    अमेरिका: अमेरिकन सीमेजवळील(Border Of America) मेक्सिकन सिटीच्या रेनोसामध्ये वाहनांवर सवार हल्लेखोरांनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार (Attacks by armed gunmen) केला. या हिंसक घटनेत किमान १८ जणांचा मृत्यू(18 People Dead On America -Maxico Border) झाल्याची माहिती मिळाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हातात शस्त्रे असलेले हे हल्लेखोर वाहनांवरून आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला.

    या घटनेनंतर गोंधळ उडाल्याचे सुरक्षा दलाचे म्हणणे आहे. सुरक्षा दलाला चार संशयितांना ठार करण्यात यश आलं आहे. यामध्ये सीमा पुलाजवळ ठार झालेल्या व्यक्तीचा समावेशही आहे. शनिवारी दुपारी हा हल्ला सुरू झाला. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये रेनोसाच्या रस्त्यांवर मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत दिसत आहेत.

    नागरिकांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी रेनोसाचे महापौर माकी एस्तेर ऑर्टिज डोमिंग्यूझ यांनी ट्विटरवरुन मागणी केली. तामाउलिपासचे राज्यपाल फ्रान्सिस्को ग्रॅसिया कॅबेझा डी वका यांनी रविवारी या घटनेचा निषेध केला आणि ठार झालेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला. हल्ल्यामागील हेतू तपासला जाईल, असे ते म्हणाले.

    या घटनेनंतर मेक्सिकन आर्मी, नॅशनल गार्ड, राज्य पोलीस आणि इतर एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की त्यांनी दोन महिलांचे अपहरण करुन त्यांना आपल्या गाडीत घेऊन जात असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे, तसंच तीन वाहने जप्त केली आहेत.