दुबईला प्रवास करताय आधी ‘ही’ नवीन कोविड मार्गदर्शक नियमावली जरूर वाचा

अमिराती एअरलाईन्स (Emirates airline) भारत, दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियाहून उड्डाणांना २३ जूनपासून सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान दुबई सरकारने प्रवासी निर्बंधामध्ये सूट जाहीर केली आहे. एप्रिलमध्ये कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेका दरम्यान भारतातील प्रवाशांना UAEचे दरवाजे बंद केले होते.

  दिल्ली: कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अनेक देशांनी सहलीसाठी येणाऱ्या प्रवाश्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या प्रशासकीय नियमानुसार भारतीय नागरिकांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर दुबईत एंट्री मिळणार आहे. प्रवास करणाऱ्या प्रवाश्याकडे वैध निवास व्हिसा (valid residence visa) असणे आवश्यक आहे. नुकतीच अमिराती एअरलाईन्स (Emirates airline) भारत, दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियाहून उड्डाणांना २३ जूनपासून सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान दुबई सरकारने प्रवासी निर्बंधामध्ये सूट जाहीर केली आहे. एप्रिलमध्ये

  महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेका दरम्यान भारतातील प्रवाशांना UAEचे दरवाजे बंद केले होते.

  अशी आहे नवीन मार्गदर्शकी नियमावली

  • वैध निवासी व्हिसा घेऊन आलेल्या प्रवाशांसाठी यूएईकडून मान्यता प्राप्त लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे.
  • भारतातून दुबईला जाणाऱ्या सर्व प्रवाशांकडे ४८ तासांदरम्यान केलेला कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह अहवाल असणे गरजेचे आहे. फक्त QR कोडवाले निगेटिव्ह PCR टेस्ट प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.
  • दुबईसाठी उड्डाण होण्यापूर्वी सर्व भारतीय प्रवाशांना चार तासांपूर्वी रॅपिड PCR टेस्ट करावी लागेल.
  • दुबईत पोहोचल्यानंतरही RT-PCR टेस्ट करावी लागेल.
  • तसेच कोरोना चाचणी अहवाल येईपर्यंत भारतीय प्रवाशांना क्वारंटाईन व्हावे लागले. हा अहवाल २४ तासांत येतो.यूएईमध्ये सिनोफार्म (Sinopharm), फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech), स्पुटनिक व्ही आणि ऑक्सफोर्ड एस्ट्रानेजेका (AstraZeneca)ला मंजूरी दिली गेली आहे.
  • दरम्यान दुबई एअरपोर्टचे टर्मिनल १ हे तब्बल १५ महिन्यांनंतर गुरुवारपासून खुले केले जाईल. कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी टर्मिनल २ आणि ३ बंद केले होते. आता दुबईत प्रवाशी येण्याची संख्या अधिक असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.