पाकिस्तानच्या सैनिकाचा केला शिरच्छेद; तालिबानने मृतदेह झाडाला लटकावला

रहमान जमान असे मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकाचे नाव आहे. अफगाण पत्रकार सुहैब झुबेरी यांनी सोशल मीडियावर तालिबानच्या क्रूरतेची माहिती दिली आहे. इतरही काही लोकांनी याबाबत सोशल मीडियावरच माहिती दिली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे या संदर्भात पाकिस्तानी लष्कर किंवा सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

    इस्लामाबाद : पाकिस्तान सरकार (Pakistan Government) आणि तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) यांच्यातील युद्धविराम संपल्याचा परिणाम दिसून येत आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वामध्ये टीटीपीने एका पाकिस्तानी सैनिकाची (Pakistani Soldier) हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला. मृतदेहासोबत धमकीचे पत्रही जोडले होते. यामध्ये मृतांच्या अंत्यसंस्कारात कोणीही सहभागी होऊ नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, असे स्थानिकांना सांगण्यात आले आहे.

    रहमान जमान असे मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकाचे नाव आहे. अफगाण पत्रकार सुहैब झुबेरी (Suhaib Zuberi) यांनी सोशल मीडियावर (Social Media) तालिबानच्या क्रूरतेची माहिती दिली आहे. इतरही काही लोकांनी याबाबत सोशल मीडियावरच माहिती दिली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे या संदर्भात पाकिस्तानी लष्कर किंवा सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

    सुहैबच्या म्हणण्यानुसार, बन्नू जिल्ह्यातील जानीखेल भागात शिपाई रहमानचा शिरच्छेद करण्याची घटना घडली. त्यानंतर त्याचे डोके बाजारातील झाडाला लटकवण्यात आले. मृतदेहासोबत स्थानिक पश्तो भाषेत लिहिलेले पत्र होते. जवानाच्या अंत्यसंस्काराला कोणीही उपस्थित राहू नये, अन्यथा परिणाम वाईट होईल असे लिहिले होते.