H1 visa us

चीनच्या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हजाराे भारतीय विद्यार्थ्यांनी परत अध्ययन करण्यासाठी व्हिसाची परवानगी मागितली आहे. त्यावरही चीन प्रशासन काम करत असल्याचे सांगण्यात आले.

    नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय व्यावसायिक, विद्यार्थ्यांवर असलेली व्हिसा बंदी मागे घेण्याचा निर्णय चीनने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे चीनच्या विविध शहरांत काम करणारे भारतीय कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळेल.

    चीनच्या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हजाराे भारतीय विद्यार्थ्यांनी परत अध्ययन करण्यासाठी व्हिसाची परवानगी मागितली आहे. त्यावरही चीन प्रशासन काम करत असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी चीनच्या राजदूत कार्यालयाने कोविड-१९ व्हिसा धाेरणात बदल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. दोन वर्षांनंतर व्हिसाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.