बीजिंगकडून अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसींसह त्यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध

नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीला चीन आपल्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप मानत आहे. तसेच, या कारणामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय, तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून सादर करतो आणि चीनवर विस्तारवादी असल्याचा आरोप करतो.

    बीजिंगने (Beijing) अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या (US House of Representative) अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध (Restrictions On Family Members) लादण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या (China Foreign Ministry) प्रवक्त्याने माहिती दिली. चीनच्या सरकारी मीडिया हाऊस सीजीटीएनने (CGTN) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पेलोसी त्यांच्या आशिया दौऱ्यादरम्यान तैवानच्या (Taiwan) दौऱ्यावर होत्या. यावरून चीनने मोठा गदारोळ केला. शिवाय, चीन हा तैवानला स्वतःचा वेगळा प्रांत मानतो आणि वेळ आल्यावर या बेट देशाला स्वतःमध्ये विलीन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

    नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीला चीन आपल्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप मानत आहे. तसेच, या कारणामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय, तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून सादर करतो आणि चीनवर विस्तारवादी असल्याचा आरोप करतो.

    जगातील बहुतेक मोठे देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तैवानच्या भूमिकेशी सहमत आहेत. त्यामुळे चीनच्या नाराजीत आणखी वाढ झाली आहे. नॅन्सी पेलोसी तैवानमधून बाहेर पडल्यानंतर चीनने तैवानच्या आसपास पाण्यात प्राणघातक क्षेपणास्त्रे डागली. मात्र, ही क्षेपणास्त्रे त्यांच्या लष्करी सरावाचा एक भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. पण बीजिंग तैवानला त्याच्या लष्करी सामर्थ्याची भीती दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेचे मत आहे.